भारतासह जगभरातील लोक कोरोनाच्या माहामारीचा सामना करत आहेत. अमेरिका, ब्राझिल, भारत आणि ब्रिटन या देशांमध्ये सगळ्यात जास्त कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी आणि जनजीवन सुरळित होण्यासाठी लस कधी उपलब्ध होणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच आहे. जगभरातील १०० पेक्षा जास्त देशात कोरोनाच्या लसीचे परिक्षण सुरू आहे. तर अनेक लसींच्या चाचण्या या अंतिम टप्प्यातील परिक्षणात पोहोचल्या आहेत. दरम्यान एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
अमेरिकेतील लस चाचणी शेवटच्या टप्प्यात असून आता तब्बल ३० हजार लोकांना लस देण्यात येणार आहे. अमेरिकेने तयार केलेल्या या लसीचे नाव mRNA 1273 असं आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ अँड मॉडर्ना इंक (moderna inc) कंपनीने ही लस तयार केली आहे. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी ४५ लोकांना ही लस देण्यात आली होती. त्यावेळी रोगप्रतिकारकशक्तीत झालेली बदल दिसून आला. तसंच लस दिल्यानंतर ताप येणं, अंगदुखी अशा सौम्य शारीरिक समस्या उद्भवल्या होत्या.
आता ही लस ३० हजार लोकांना दिली जाणार आहे. ज्या लोकांना ही लस दिली जाणार आहे, त्यांना खरी लस दिली जात आहे की लसीच्या स्वरुपात बदल करून ही लस दिली जाणार आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही. दोन डोस दिल्यानंतर याचा काय परिणाम होतो हे पाहिले जाणार आहे. शेवटच्या टप्प्यात असलेल्या कंपनीच्या लसीचं ट्रायल ३० हजार लोकांवर होईल. या महिन्यात मॉडर्ना, पुढील महिन्यात ऑक्सफर्ड, सप्टेंबरमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन आणि ऑक्टोबरमध्ये नोवावॅक्सच्या लसीचा अभ्यास होईल. फाइजर आयएनसी स्वत:च आपल्या ३० हजार लोकांवर चाचणी करणार आहे.
दरम्यान ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरू केले आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीया पुण्यातील कंपनी आहे. सीरम इंडीया इंस्टिट्यूट आणि एक्स्ट्राजेनका यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत २ ते ३ कोटी लसीचे डोस तयार होतील. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीचे नाव ChAdOx1 nCoV-19 आहे. भारतात या लसीला कोविडशील्ड (covid shield) असं नाव देण्यात आलं आहे. भारतात कोरोनाची कोविडशील्ड ही लस तयार झाल्यानंतर देशातील मुंबई आणि पुण्यातील लोकांना सगळ्यात आधी दिली जाण्याची शक्यता आहे.
दालचिनीच्या सेवनाने होतात 'हे' ६ फायदे; कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास होईल मदत
जास्त खाणं सोडाल तरच कोविड 19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा टळेल धोका, 'या' देशातील आरोग्यमंत्र्यांचा सल्ला