शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: काही सॅनिटायझरमध्ये होतोय टॉक्सिक मेथानॉलचा वापर; दृष्टी जाण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 14:52 IST

कंज्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून गंभीर माहिती उघड

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत हात धुण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. मात्र कंज्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियानं (सीजीएसआय) केलेल्या अभ्यासातून काही सॅनिटायझर शरीरासाठी हानीकारक असल्याचं आढळून आलं आहे. १२२ पैकी ५ सॅनिटायझरमध्ये टॉक्सिक मेथानॉल आढळून आलं आहे. तर ४५ सॅनिटायझरमधील केमिकल आणि त्याच सॅनिटायझरच्या बाटल्यांवरील माहिती यांची जुळलेली नाही.आणखी ३ महिने तरी कोरोना जाणार नाही; सरकारने घेतला आता मोठा निर्णयसीजीएसआयनं १२२ सॅनिटायझरमध्ये वापरण्यात आलेल्या केमिकल्सची तपासणी केली. त्यातल्या ४ टक्के सॅनिटाझरमध्ये टॉक्सिक मेथानॉल आढळून आलं. यामुळे डोळ्यांना धोका पोहोचू शकतो आणि दृष्टीही जाऊ शकते. ३१ ऑगस्टला सीजीएसआयनं आपला अहवाल प्रसिद्ध केला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरातील दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या सॅनिटायझरमधील घटकांची तपासणी करून सीजीएसआयनं अहवाल सादर केला. सॅनिटायझर तयार करणाऱ्या कंपन्या त्यासाठी वापरण्यात आलेल्या घटकांची माहिती लेबलवर देतात. ती माहिती आणि प्रत्यक्षात सॅनिटायझरमधील घटक जुळतात, याची तपासणी सीजीएसआयनं केली.खुशखबर! लसीशिवायही जग करू शकणार कोरोनाचा सामना; WHO चा दावाराष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत ऑगस्ट २०२० मध्ये गॅस क्रोमॅटोग्राफीच्या माध्यमातून सीजीएसआयनं सॅनिटायझरचे नमुने तपासले. 'सध्या अनेक दुकानं आणि केमिस्टमधून सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. कोरोनामुळे सॅनिटायझरची मागणी वाढल्यानं अनेक नवे उत्पादक सॅनिटायझरची निर्मिती करत आहेत. त्यांच्याकडून दर्जा राखला जात नाही. उत्पादक भेसळ करत असल्यानं ग्राहकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो,' असं सीजीएसआयनं अहवालात म्हटलं आहे.चिंताजनक! 'या' कारणामुळे महिलांच्या तुलनेत पुरूषांसाठी जास्त जीवघेणा ठरतोय कोरोनाहँड सॅनिटायझर ओव्हर द काऊंटर उत्पादन असून त्याच्या दर्जा अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासला जातो. 'सॅनिटायझरमध्ये टॉक्सिक मेथानॉलचा वापर करण्यास मनाई आहे. कारण टॉक्सिक मेथानॉलवर बंदी आहे. मात्र काही उत्पादक टॉक्सिक मेथानॉलचा सॅनिटायझरमध्ये वापर करतात. ते ग्राहकांच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकतं,' असं सीजीएसआयनं अहवालात नमूद केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या