शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

सावधान! कोरोनाचं नवं लक्षण आलं समोर, असं काही होत असेल तर वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 14:39 IST

किंग्स कॉलेज लंडनचे प्राध्यापक टिम स्पेक्टर यांनी 'कोरोना टंग'लाही कोरोनाच्या लक्षणांमध्ये सामिल करण्याची मागणी केली आहे.

कोरोना व्हायरस टेस्टआधी सुरूवातीच्या लक्षणांवरूनच संक्रमित व्यक्तीची ओळख पटवली जाते. प्रमुख लक्षण ताप, खोकला, सर्दी, घशात खवखव सांगितले जातात. आतापर्यंत याच लक्षणांच्या आधारावर लोकांना संक्रमण झाल्याचं मानण्यात आलं आहे. किंग्स कॉलेज लंडनचे प्राध्यापक टिम स्पेक्टर यांनी 'कोरोना टंग'लाही कोरोनाच्या लक्षणांमध्ये सामिल करण्याची मागणी केली आहे.

आरोग्यासंबंधी गाइडलाइन आणि रोगांची लक्षणे व औषधांबाबत रिसर्च, नियम करणाऱ्या NHS या संस्थेकडे टिम स्पेक्टर यांनी मागणी केली 'कोरोना टंग' ला कोरोना व्हायरसचं लक्षण म्हणून अधिकृतपणे घोषित करावं. असं झालं नाही तर कोरोनाने संक्रमित व्यक्तीला वेळेवर उपचार मिळणार नाहीत आणि संक्रमण वेगाने पसरेल. स्पेक्टर यांनी दावा केला आहे की, संक्रमित लोकांच्या वाढत्या संख्येदरम्यान जीभेवर घाव, सूज आणि तोंडाला अल्सरसारखी लक्षणे समोर येत आहेत. (हे पण वाचा : अरे देवा! एकापेक्षा जास्त रूप बदलून अधिक घातक होत आहे कोरोना व्हायरस, रिसर्चमधून खुलासा....)

या लक्षणाचा पर्याय कोविड सिम्टम्स ट्रॅकर अ‍ॅपमध्ये नसल्याने संक्रमित व्यक्ती इच्छा असूनही त्याची माहिती सरकारपर्यंत पोहोचवू शकत नाही. डेली मेलच्या रिपोर्टटनुसार, प्राध्यापक स्पेक्टर यांनी इशारा दिला आहे की, २० टक्के संक्रमित लोक दुर्लक्ष केल्या कारणाने वेळेवर उपचार घेऊ शकत नाहीत. हे संक्रमण वेगाने वाढण्याचं कारण ठरू शकतं. NHS सध्या संक्रमणाचे केवळ तीन लक्षणेच मानते, ताप, सतत खोकला येणे आणि गंध अथवा चव जाणे म्हणजे ही लक्षणे असणारे लोक संक्रमित असू शकतात. अशात अशाच लोकांनाच आयसोलेट केलं जाईल आणि त्यांची टेस्ट केली जाईल.

अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्र CDC प्राथमिक लक्षणांबाबत इशारा देतात ज्यात थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश आहे. प्राध्यापक स्पेक्टर यांचा दावा आहे की, 'कोविड संक्रमित पाच लोकांपैकी एका व्यक्तीमध्ये इतर लक्षणे समोर येत आहेत. ही लक्षणे यादीत सामिल करण्यात आलेली नाहीत. कोविड टंग आणि तोंडात फोडं येणे यांच्या वाढत्या संख्येसोबतच डोकेदुखी आणि थकवा येणारे रूग्णही समोर येत आहेत.

ब्रिटीश डेंटल असोसिएशनचे प्रवक्ता प्राध्यापक डेमियन वाल्स्ले यांच्यानुसार, तोंडात फोड येण्यासहीत इतर संक्रमणामुळेही जीभेवर लाल आणि पांढरे चट्टे असू शकतात. ते म्हणाले की, 'पांढरे चट्टे सामान्यपणे वाढतात. ज्यामुळे लाल रंगाचे पॅच येतात. हे त्या लोकांमध्येही असू शकतात जे अ‍ॅंटीबायोटिक्स घेत आहेत. किंवा अस्थमा इनहेलरचा वापर करत आहेत'. (हे पण वाचा : वैज्ञानिकांचा इशारा! लहान मुलांना हॅंड सॅनिटायजर देताय? जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी...)

किंग्स कॉलेज लंडनचे प्राध्यापक स्पेक्टर आणि वैज्ञानिकांनी एक सिम्टम्स ट्रॅकिंग अ‍ॅप तयार केलं आहे. ज्याद्वारे ब्रिटनमधील लाखो लोक आपल्या लक्षणांबाबत रिपोर्ट करत आहेत. या अ‍ॅपद्वारे एक यादी तयार करण्यात आली आहे. जी खालीलप्रमाणे आहे.

१) चव आणि गंध जाणे

२) सतत खोकला येणे

३) थकवा

४) भूक कमी लागणे

५) त्वचेवर चट्टे येणे

६) पीत्त होणे

७) ताप येणे

८) मांसपेशींमध्ये वेदना

९) श्वास घ्यायला त्रास

१०) जुलाब

११) बेशुद्ध पडणे

१२) पोट दुखणे

१३) छातीत दुखणे

१४) घशात खवखव

१५) डोळे दुखणे

१६) घसा दुखणे

१७) मळमळ किंवा उलटी

१८) डोकेदुखी

१९) चक्कर येणे किंवा कमी दिसणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनHealthआरोग्यLondonलंडन