शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

Coronavirus : वैज्ञानिकांनी सांगितले 'ही' आहेत कोरोनाची दोन मु्ख्य लक्षणे, दिसताच लगेच डॉक्टरांना करा संपर्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 10:46 IST

हा रिसर्च ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिड्समधील वैज्ञानिकांनी केला. या वैज्ञानिकांनी 9 देशातील 24 हजार रूग्णांवर रिसर्च केला.

कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. दररोज हजारो नवीन केसेस समोर येत आहेत. तर दुसरीकडे कोरोना व्हायरसबाबत रिसर्चमधून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाची आतापर्यंत वेगवेगळी लक्षणे सांगण्यात आली आहेत. काही लक्षणे सतत बदलतही आहेत. अशात आता एका रिसर्चमधून कोरोना व्हायरसच्या दोन मुख्य लक्षणांवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. सतत खोकला आणि ताप ही दोन कोरोनाची दोन मुख्य लक्षणे असल्याचं सांगण्यात आलं आहे.

theweek.in ने दिलेल्या वृत्तानुसार, 'पीएलओएल वन' जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये ही दोन प्रमुख लक्षणे असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच यात थकवा, चव न लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे यांचाही समावेश आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलेली लक्षणेच WHO ने आधी जाहीर केली होती.

24 हजार रूग्णांवर रिसर्च

(Image Credit : thailandmedical.news)

हा रिसर्च ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिड्समधील वैज्ञानिकांनी केला. या वैज्ञानिकांनी 9 देशातील 24 हजार रूग्णांवर रिसर्च केला. या रूग्णांमध्ये दिसलेल्या सामान्य लक्षणांची ओळख पटवण्यासाठी 148 वेगवेगळ्या रिसर्चची आकडेवारी बघितली. या 9 देशांमध्ये ब्रिटन, चीन आणि अमेरिकेचा समावेश आहे.

वैज्ञानिकांनी सांगितले की, हा रिसर्च कोविड 19 बाबत करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या समीक्षेपैकी एक आहे. वैज्ञानिकांनी हे मान्य केलंय की, अशा लोकांचीही मोठी संख्या आहेत, ज्यांच्यात लक्षणे नाहीत पण त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

ताप आहे सर्वात मोठं लक्षण

लीड्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये सर्जन आणि क्लिनिकल रिसर्च फेलो वेड म्हणाले की, 'या विश्लेषणातून हे स्पष्ट होतं की, कोविड-19 ने संक्रमित लोकांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांमध्ये खोकला आणि ताप सामान्य लक्षणं होती'. रिसर्चमधून समोर आले की, 24410 केसेसमध्ये 78 टक्के लोकांना ताप होता तर 57 टक्के लोकांना खोकला होता.

ICMR ने सांगितली दोन नवीन लक्षणे

तशी तर कोरोनाची मुख्य लक्षणे खूप ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही आहेत. पण ICMR ने नुकतीच कोरोना व्हायरस लक्षणांची लिस्ट अपडेट केली. ज्यात त्यांनी काही नवीन लक्षणांचा समावेश केला. या लिस्टमध्ये कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये आता मांसपेशींमध्ये वेदना होणे, घशात कफ तयार होणे, नाक बंद होणे आणि घशात खवखव होणे, घशात वेदना होणे, डायरिया ही लक्षणे आधीच जोडण्यात आली होती. पण आता यात दोन नवीन लक्षणांचा समावेश करण्यात आलाय. जसे की, टेस्ट न लागणे किंवा सुंगध न येणे.

किती दिवसात दिसतात लक्षणे?

आतापर्यंत समोर आलेल्या रिसर्चनुसार, कोरोना व्हायरसची लक्षणे व्हायरसच्या संपर्कात आल्यावर 2 ते 14 दिवसाच्या आत दिसू लागता. सुरूवातील शरीरात वेदना, ताप आणि खोकला होतो. पण आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, शरीरात दिसणाऱ्या आणि जाणवणाऱ्या या दोन लक्षणांआधीही दोन नवीन लक्षणे जाणवतात. जी कोरोना व्हायरस संक्रमणाची असू शकतात.

या लक्षणांकडे जास्तीत जास्त लोक दुर्लक्ष करतात. या दोन लक्षणांमध्ये व्यक्तीला काही खाताना टेस्ट लागत नाही आणि कशाचाही सुगंध येत नाही. म्हणजे कोरोना व्हायरस तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर अटॅक करण्याआधी तुमच्या टेस्टच्या ग्रंथींना नुकसान पोहोचवतो. पण सगळ्यांमध्येच ही लक्षणे दिसतात असे नाही.

चपला, बुटांसोबत तुम्ही कोरोना विषाणूही घरी आणताय का? 'अशी' घ्या काळजी

Coronavirus : CDC चा सल्ला, महामारी दरम्यान घराबाहेर पडताना 'या' 3 वस्तू न विसरता ठेवा सोबत!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनInternationalआंतरराष्ट्रीय