शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

घरात राहूनही 'असा' होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग; हे उपाय वापरा आणि संसर्गापासून लांब राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 10:29 IST

हवा नसलेल्या ठिकाणी थांबल्यास कमी वेळातच व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. 

कोरोनापासून बचावासाठी जास्तीत जास्त लोक घरात थांबत आहेत. एसी कुलरच्या हवेत आपला वेळ घालवत आहेत. पण घरी राहून कोरोना व्हायरसपासून बचाव केला जाऊ शकतो का? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात. हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तज्ज्ञांच्यामते कोरोनाचा धोका घराबाहेरच नाही तर घरात सुद्धा अधिक तीव्रतेने जाणवू शकतो. 

बंद जागेत किंवा व्हेंटिलेशन कमी असलेल्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार वेगाने होतो.  लिफ्टसारख्या लहानश्या जागेतही संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरू शकते. अमेरिकेतील वेंडरबिल्ट युनिव्हरसिटीतील संक्रामक रोगतज्ज्ञ प्राध्यापक विलियम शेफनर यांनी दिलेल्या माहितीनुसार हवा नसलेल्या ठिकाणी थांबल्यास कमी वेळातच व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. 

साधारणपणे घराच्याबाहेर व्हायरसचा धोका कमी असतो. कारण नैसर्गिक हवा  आणि लोकांपासून लांब राहता येतं. शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो. द जर्नल ऑफ इनफेक्शियस डिजीजच्या एका अभ्यातून दिसून आलं की,  सुर्याच्या संपर्कात आल्यानंतर कोरोनाचे विषाणू काही प्रमाणात निष्क्रिय होतात. अनेक तज्ज्ञांनी उन्हामुळे कोरोना नष्ट होऊ शकेल असा दावा केला होता. पण WHO ने  कोरोना विषाणूवर तापमानाचा परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आरोग्यतज्ज्ञांनी शारीरिक आणि मानसिक ताण-तणावातून बाहेर येण्यासाठी खेळणं, धावणं, सायकल चालवणं अशा फिजिकल एक्टिव्हिटीज महत्वाच्या असल्याचं सांगितले आहे. एसी किंवा रुममध्ये चांगलं व्हेंटिलेशन नसल्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. चीनच्या एका रेस्टॉरंटमध्ये एसीमुळे कोरोनाचा विषाणू पसरल्याची घटना घडली होती. खोकला किंवा शिंकण्यातून, बोलताना ड्रॉपलेट्स एसीच्या हवेमार्फत संपूर्ण परिसरात पसरू शकतात. अशा घटना सावर्जनिक ठिकाणी घडण्याची शक्यता जास्त असते.

न्यूयॉर्कच्या Mount Sinai Health System चं म्हणणं आहे की, घरातील एखादी व्यक्ती कोरोना विषाणूंनी संक्रमित असेल तर सावधगिरी बाळगायला हवी.  कोरोना व्हायरसचे लहान कण एसी किंवा पंख्यामार्फत  पसरतात त्यामुळे संसर्ग होऊ शकतो.  तज्ज्ञांच्यामते घरातील खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे व्हायरसचे कण बाहेर निघून जाण्यास मदत होते.

घरातील पडदे  उघडून काहीवेळ ताजी हवा घरात येऊ दिल्यास संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. याशिवाय घरात असताना सतत तोडांला हात लावू नका, सतत साबणाने हात स्वच्छ धुवा. मास्क लावणं, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं अशा नियमांमुळे कोरोनापासून स्वतःला लांब ठेवता येईल.

सतत मास्क लावल्यानंतर घाम आणि गुदमरण्याची समस्या उद्भवते? मग 'हे' वाचाच

सर्दी, खोकलाच नाही; तर विषाणूंच्या संसर्गापासूनही लांब राहाल, जर १ ग्लास हळदीचे पाणी प्याल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स