शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 01:07 IST

- डॉ. अमोल अन्नदाते (लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.) सध्या मुंबईसह राज्याच्या अनेक भागात सीरोसर्व्हीलंसचे काम केंद्र ...

- डॉ. अमोल अन्नदाते(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)सध्या मुंबईसह राज्याच्या अनेक भागात सीरोसर्व्हीलंसचे काम केंद्र शासनातर्फे सुरू आहे. एखाद्या भागात किती लोकसंख्येला आता संसर्ग झाला आहे हे तपासणे म्हणजे सीरोसर्व्हीलंस होय.

हे कसे केले जाते ?यासाठी बाधित झालेले तसेच न झालेले जनतेतून सहजगत्या कुठला ही व्यक्तींचा समूह निवडला जातो व त्यांच्या शरीरात संसर्ग होऊन गेला आहे हे व प्रतिकारशक्तीचे घटक - अँटिबॉडीचे प्रमाण तपासण्यात येते. त्यामुळे एखाद्या गावात किंवा शहरात किती लोक आता बाधित होऊन गेले आहेत याचा अंदाज येतो. तसेच या अँटिबॉडीचे प्रमाण जास्त आहे की कमी, हेही मोजले जाते.

याचा उपयोग काय होतो?तीन गोष्टी यावरून समजतात किती टक्के जनता बाधित झाली आहे यावर प्रतिबंधाचे धोरण ठरवता येते.सर्व समाजाची एकत्रित व बहुतांश लोकसंख्या संसर्गित झाल्याने निर्माण होणारी हर्ड इम्युनिटी म्हणजे सर्वांना सामूहिक प्रतिकारशक्ती बहाल करणारी कळप प्रतिकारशक्ती निर्माण होते आहे कि नाही हे लक्षात येते.अँटिबॉडीचे प्रमाण किती निर्माण झाले आहे व किती काळ टिकते हे मोजून, एकदा संसर्ग झाल्यावर परत किती काळ संसर्ग होण्याची शक्यता हे लक्षात येते अर्थात पहिला संसर्ग किती काळ पुढच्या संसर्गापासून नैसर्गिक प्रतिकारशक्ती बहाल करतो हे लक्षात येते.यावरून लस परिणामकारक राहील की नाही हे ही कळते. सीरोसर्व्हीलंसचे निष्कर्ष काय ?लक्षणविरहीत संसर्ग झालेल्यांमध्ये अँटिबॉडीचे प्रमाण फारसे नाही व ते एक महिन्यापर्यंतच टिकते आहे व सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्यांमध्ये ही अँटिबॉडीचे प्रमाण असले तरी ते तीन महिन्यात कमी होते आहे.

याचा परिणाम काय होऊ शकतो?सीरोसर्व्हीलंस सुरु असल्याने याचे अंतिम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. पण आतापर्यंतच्या मर्यादित निकालांवरून पहिल्या कोरोना संसगार्तून मिळणारी प्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकेलच असे खात्रीशीर रित्या सांगता येत नाही. म्हणून संसर्गित झालेले व न झालेले असे दोन्ही गटांना प्रतिबंधाचे सर्व उपाय चालू ठेवणे गरजेचे आहे. अजून६ महिने ते वर्षभर सीरोसर्व्हीलंसनंतर चित्र अजून स्पष्ट होईल.

सीरोसर्व्हीलंसला सहकार्य कराकाही भागांमध्ये कशासाठी रक्त घेत आहेत, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आम्हाला कुठे घेऊन जातील, अलगीकरण / विलगीकरण करतील अशा गैरसमज व भीतीमुळे नागरिकांना सहकार्य केले नाही व रक्ताचे नमुने देण्यास नकार दिला. पण ही रक्ताची तपासणी तुमच्या आताच्या संसर्गाच्या निदानासाठी नव्हे तर होऊन गेलेल्या संसर्गासाठी आहे. तसेच या चाचणीचा आधार घेऊन कोणालाही बळजबरीने रुग्णालयात दाखल केले जात नाही. म्हणून सर्वांनी शासकीय कर्मचारी येतील तेव्हा सहकार्य करावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य