शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

धक्कादायक! ताण तणाव जास्त असल्यास वाढतो कोरोनाच्या संक्रमणाचा धोका, तज्ज्ञांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:23 PM

CoronaVirus News Latest Update : जास्त ताण घेतल्याने कॉर्टिसोल या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं.  

कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.  कोरोना या जीवघेण्या व्हायरसच्या माहामारीबाबत शास्त्रज्ञांकडून शेकडो नवनवीन रिसर्च समोर येत आहेत. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळ्यांनाच ताण तणावांचा सामना करावा लागतो.  गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेकांची काम बंद होती.

आर्थिक गोष्टींमुळे अनेकांंमध्ये नैराश्याची भावना होती. अलिकडे करण्यात आलेल्या रिसर्चनुसार ताण तणावामुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो.  या संशोधनात ताण-तणाव आणि कोरोनाचे संक्रमण यांतील संबंधांचा अभ्यास करण्यात आला होता. 

द लेसेंट डायबिटीज एंड एंडोक्रिनोलॉजी यामध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. यात संशोधकांनी दावा केला आहे की, ताण तणाव घेत असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा धोका जास्त असतो.  मानसिक तणावासंबंधीत हार्मोन्सचे अतिप्रमाण कोरोनामुळे  होत असलेल्या मृत्यूचं कारण ठरू शकतं. जास्त ताण घेतल्याने कॉर्टिसोल या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं.  निरोगी लोकांच्या शरीरात कॉर्टिसोलचं प्रमाण १०० -२०० NM/L असते.

झोपताना या हार्मोन्सचं प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते. या संशोधनातून दिसून आले की,  जास्त ताण तणाव घेत असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचे संक्रमण होऊन मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. याआधीसुद्धा अनेक संशोधनातून दिसून आले आहे की, ताण-तणाव वाढल्यामुळे जीवघेण्या आजारांचा धोकाही वाढतो. दैनंदिन जीवन जगत असताना जास्त ताण न घेता आनंदमय वातावरणात राहिल्यास हा धोका टळू शकतो.

दरम्यान कोरोना व्हायरसचा भारतातील मृत्यूदर कमी असला तरी कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली  आहे. त्यामुळे थप्प पडलेली कामं, व्यवहार पुन्हा सुरू झाली आहेत.परंतु रुग्ण संख्या आटोक्यात येत नाही.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 90 लाखांवर गेली आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अकराव्या व नंतर नवव्या स्थानी असलेला भारत आता चौथ्या स्थानी आला आहे. तर देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. 

धोका वाढला! कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका असलेल्यांसाठी; लस उपयोगी ठरणार नाही

Coronavirus : CDC चा सल्ला, महामारी दरम्यान घराबाहेर पडताना 'या' 3 वस्तू न विसरता ठेवा सोबत!

टॅग्स :Researchसंशोधनcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य