शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

मोठा दिलासा! कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी Itolizumab इंजेक्शनचा वापर होणार; DCGI कडून परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 14:01 IST

CoronaVirus News & Latest Update : कोरोनाच्या माहामारीच्या काळात या इंजेक्शनला कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी परवानगी मिळाल्यामुळे आशेचा किरण दाखवला आहे.

जगभरासह भारतात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाने मृत्यू होत असलेल्यांचा धडकी भरवणारा आकडा समोर येत आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन उठवण्यात आला होता. पण कोरोनाचं संक्रमण वाढत असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. संपूर्ण जगभरात लोक कोरोनाच्या लसीच्या प्रतिक्षेत आहेत. अशा स्थितीत एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. DGCI म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी Itolizumab Injection च्या वापराला मंजूरी दिली आहे. केवळ आपातकालीन स्थितीत या इंजेक्शनचा वापर करण्यात येईल असे ते म्हणाले आहेत.

 माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक चाचण्यामध्ये Itolizumab या इंजेक्शनचे समाधानकारक परिणाम दिसून आल्यानंतर DGCI ने मंजूरी दिली आहे. कोरोनाच्या माहामारीच्या काळात या इंजेक्शनला कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी परवानगी मिळाल्यामुळे आशेचा किरण  दाखवला आहे. या इंजेक्शनचा वापर सोरायसिसच्या रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात होता. बायोकॉन लिमिटेडचे हे उत्पादन आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आतापर्यंत गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात होता.  रेमडिसीवीर या औषधांचे जेनेरिक वर्जन तयार करण्यासाठी भारतात परवागनी देण्यात आली आहे.सिप्लाने मुंबईतील बीडीआर फार्माकडून मॅन्युफॅक्चरिंगचा करार केला आहे. त्या बदल्यात बीडीआर फार्माने तयार डोस आणि पॅकेजिंगसाठी सॉवरेन फार्माशी करार केला. 

सिप्लाच्या सीएफओच्या मते, हे  औषध लवकरच उपचारांसाठी तयार होणार आहे. मात्र, सध्या किती डोस तयार आहेत याबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही. अहवालानुसार, सिप्ला Cipremi नावाने औषध सुमारे ४ हजार रुपये प्रति वॉयलच्या दराने विकले जाईल. म्हणजेच हेटरो ग्रुपपेक्षा ते १४०० रुपयांनी स्वस्त असेल. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) कडून मान्यता मिळाल्यानंतर हेटरो ग्रुपने Covifor नावाने औषधांची निर्मिती व विक्री सुरू केली आहे. 

आतापर्यंत केवळ त्यांचीच औषधे पुरविली जात आहेत. कंपनीने एका वॉयलची किंमत ५४०० रुपये ठेवली आहे. आतापर्यंत केवळ 20 हजार वॉयलचा पुरवठा केला आहे. सिप्लाच्या या घोषणेमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण रेमडेसिवीरची मागणी वाढत आहे. हे औषध मध्यम ते अत्यवस्थ कोविड -१९ रुग्णांच्या उपचारासाठी मंजूर केले गेले आहे.

धोका वाढला! आता कोरोना विषाणू कधीही पाठ सोडणार नाही; WHO नं दिली धोक्याची सूचना

CoronaVirus : कोरोना व्हॅक्सीनवर एकाच दिवसात दोन 'गुड न्‍यूज'; 'या' देशाची व्हॅक्सीन फक्त एक पाऊल दूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या