शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

CoronaVirus News: फाविपिरावीर औषध म्हणजे म्हैस अजून पाण्यातच...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 4:07 AM

पण या औषधाविषयी सर्व सामान्यांनी व डॉक्टरांनी अत्यंत सतर्कतेने पाऊले टाकावी व या विषयीच्या सर्व गोष्टी नीट समजून घ्याव्या

नुकतेच भारतात फाविपिरावीर या औषधाची विक्री करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे औषध तोंडावाटे घेण्याचे आहे व सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्यांनी घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पण या औषधाविषयी सर्व सामान्यांनी व डॉक्टरांनी अत्यंत सतर्कतेने पाऊले टाकावी व या विषयीच्या सर्व गोष्टी नीट समजून घ्याव्या -१. सध्या हे औषध फक्त पुढील मध्यम व सौम्य कोरोना रुग्णांसाठीच वापरले जाते आहे :लठ्ठपणा वय ६० वर्षांच्या पुढेमधुमेह / उच्च रक्तदाब /फुप्फुसाचे आजारप्रतिकारशक्ती कमी असलेल्या स्थिती न्यूमोनिया२. सिरीयस व्हेंटिलेटरवरील रुग्ण व आॅक्सिजनची पातळी ९३ खाली असलेल्यांना हे औषध दिले जात नाही.3. हे औषध घेतले की आपल्या शरीरातील कोरोना नाहीसा होणार व कोरोनाचा धोका १०० % नाहीसा होणार असे मुळीच समजू नये. म्हणजे जसे मलेरियासाठी क्लोरोक्विन किंवा टायफॉइसाठी सेफट्रायएक्झोन आहे तसे कोरोनासाठी हे औषध नाही.४. या औषधाला मान्यता देताना मर्यादित रुग्णांवरील प्रयोगाचा आधार घेऊन मान्यता दिली असली तरी ही मान्यता महामारीच्या दृष्टिकोनातून देण्यात आली आहे. भारतात केवळ १५० रुग्णांवर प्रयोग करण्यात आला आहे.५. या औषधाची मान्यता प्रक्रिया जलद मान्यता प्रक्रियेअंतर्गत करण्यात आली आहे. म्हणजेच आजाराच्या महामारीचे स्वरूप , तीव्रता आणि इतर चांगल्या उपचाराचा अभाव लक्षात घेऊन तातडीची मान्यता दिलेली आहे.६. ही औषध लक्षणविरहीत रुग्णांनी मुळीच घेऊ नये.७. जरी हे औषध सौम्य व मध्यम स्वरूपाच्या रुग्णांसाठी सांगितले गेले असले तरी प्रयोग करताना प्रयोगामध्ये परदेशातील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना वर व मर्यादित रुग्णसंख्येवर प्रयोग झाले आहे.८. मान्यता घेताना एवढेच एकच औषध द्या असे सांगितले असले तरी प्रयोग करताना मात्र या सोबत इंटरफेरोन अल्फा हे महागडे औषध वाफेच्या स्वरूपात रुग्णाला देण्यात आले आहे.९. संपर्कात आलेल्यांसाठी हे औषध मुळीच वापरले जाऊ नये. त्यासाठी याला मान्यता ही दिलेले नाही.१०. कोरोना संसर्गित होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांनी स्वत:हून हे औषध घेऊ नये. त्यांना हे औषध द्यायचे कि नाही याचा निर्णय उपचार करणाऱ्या डॉक्टरवर व आरोग्य खात्यावर सोडावा. डॉक्टर योग्य निर्णय घेतील.११. हे औषध किडनीचे आजार, यकृताचे आजार, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांमध्ये वापरता येते.१२. हे औषध टीबीचे औषध पायरॅझिनॅमाइड व दम्यासाठी नियमित घेतले जाणारे औषध झ्र थिओफायलीन सोबत घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात.१३. गरोदर राहण्याच्या बेतात असलेल्या स्त्रिया व जोडप्यांनी उपचार सुरु असताना व त्यानंतर ७ दिवस संतती नियमनाची साधने वापरावी. कारण उपचार सुरु असताना किंवा किंवा त्या ७ दिवस गर्भधारणा झाल्यास जन्माला येणाºया बाळामध्ये जन्मजात व्याधी होऊ शकतात.१४. गाऊट या सांधेदुखीचा आजार, पूर्व इतिहास व रक्तात युरीक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असलेल्यांमध्ये हे औषध सांभाळून दिले जावे. कारण या औषधामुळे अशा रुग्णांमध्ये युरीक अ‍ॅसिडची पतळी वाढू शकते.१५. हे औषध घेण्याआधी एका कन्सेंट फॉर्मवर म्हणजेच परवानगी पत्रावर रुग्णाला सही करावी लागते. हा फॉर्म शक्यतो मराठीत मागून त्यावर वाचून सही करावी.१६. लहान मुलांसाठी हे औषध वापरण्याचे निर्देश नाहीत. तसेच लहान मुलांमधील बहुतांश केसेस या लक्षणविरहीत किंवा सौम्य असल्याने लहान मुलांमध्ये कुठल्याही औषधाची गरज नाही. - अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस