शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

CoronaVirus News: घटवा वजन, संसर्ग हटवा; कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्याचा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 03:50 IST

आजार नसलेल्या व लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्येही कोरोना झाल्यावर मृत्यूचे प्रमाण जास्त

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर जास्त भीती व जास्त मृत्युदर हा इतर जीवनशैलीचे आजार असलेल्यांना आहे. यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाच्या वाहिन्या रुंद असण्याचा आजार (इशेमिक हार्ट डिसीज), कॅन्सर, किडनीचे आजार जे मधुमेहामुळेच जास्त प्रमाणात होतात. कोरोना संसर्ग झाला तर तो गंभीर व जीवघेणा होण्याची शक्यता ज्या या मुख्य पाच आजारांमध्ये आहे, त्या सर्वांच्या मुळाशी लठ्ठपणा हा प्रमुख आजार आहे. आजार नसलेल्या व लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्येही कोरोना झाल्यावर मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. आज आपण प्रतिकारशक्ती कशी वाढवायची आणि त्यासाठीची औषधे शोधत आहोत. पण याचा सगळ्यात चांगला मार्ग हा आपले वजन नियंत्रणात ठेवणे हा आहे. मुळात कोरोनाच नव्हे तर इतर अनेक आजारांसाठी लठ्ठपणा हे एक कल्पवृक्षच असते.आपल्या शरीरात लठ्ठपणा सुरू झाला आहे हे कसे ओळखायचे याचे प्रत्येकाला सहज मोजता येईल, असे एक माप बुलडाणा येथील लठ्ठपणा तज्ज्ञ (ओबेसिटी कन्सल्टंट) डॉ. विनायक हिंगणे सांगतात. डॉ हिंगणे यांच्या मते नाभीच्या खाली १ इंच म्हणजे २.५ सेंटिमीटर खाली पोटाचा घेर पुरुषांसाठी ९० सेंटीमीटर व स्त्रियांसाठी ८० सेंटिमीटर लठ्ठपणा आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज दर्शवते.खरे तर हे प्रमाण पुरुषांसाठी ७८ व स्त्रियांसाठी ७२ च्या पुढे गेले की जागरूक व्हायला हवे आणि जीवनशैली तपासून पाहायला हवी. पण आधीचीपुरुष : ९० व स्त्री : ८० ही मर्यादा मात्र जीवनशैलीत मोठे बदल करणे तातडीने आवश्यक ठरेल. कोरोनापासून बचावासाठी वजन नियंत्रणात असणे आवश्यक आहे. हे खरी असले तरी घाबरून जाऊन एक महिन्यात अघोरी पद्धतीने वजन घटवणेही चुकीचे ठरेल. त्यासाठी टप्प्याने प्रयत्न करून जीवनशैलीत बदल आवश्यक असतो. यात प्रामुख्याने आहार, व्यायाम, बैठी जीवनशैली सोडून हालचाल करणे, योग्य प्रमाणात झोप आणि ताणतणावाचे व्यवस्थापन असे अशा अनेक गोष्टी असतात.- डॉ. अमोल अन्नदाते, (लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या