शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनातून रिकव्हर झालेल्यांना मोठा दिलासा; आता निश्चिंतपणे करता येईल अवयवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 13:50 IST

CoronaVirus News : डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जर कोरोनातून बरं झाल्यानंतर तुम्ही अवयवदानही करू शकतात.

देशात कोरोना संक्रमणाच्या केसेसमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेला पाहायला मिळत आहे. कोरोनातून रिकव्हर झालेल्यांना पुन्हा एकदा कोरोनाचं संक्रमण होत असल्यामुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर आपण सामान्य जीवन पुन्हा कधी जगू असा प्रश्न लोकांना पडत आहे. हैदराबादच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जर कोरोनातून बरं झाल्यानंतर तुम्ही  अवयवदानही करू शकतात.

डॉक्टरांनी  कोरोनातून बरं झालेल्या ३१ लोकांच्या अभ्यासाच्याआधारे किडनीदानाबाबत माहिती दिली आहे.हैदराबाद आणि सिकंदराबादसह देशभरातील विविध रूग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला असे आढळले आहे की कोविड -१९ मधून बरे झालेले लोक त्यांचे अवयव, विशेषत: किडनी दान करू शकतात. सर्वात महत्वाची बाब अशी आहे की दात्याकडून किंवा प्राप्तकर्त्यामध्ये संसर्गाची कोणतीही घटना आढळली नाही.

डॉक्टरांची ही टीम देशभरातील १९ किडनी प्रत्यारोपण केंद्रांमध्ये ३१ पेक्षा जास्त किडनी प्रत्यारोपणाच्या प्रकरणांमध्ये सहभागी आहे. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात, प्रत्यारोपणाचा भाग असलेले ज्येष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. के एस नायक म्हणाले की, किडनी प्रत्यारोपणानंतर झालेल्या अभ्यासानुसार आम्हाला कोणतीही कोविड -१९ ची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. हा अभ्यास ट्रान्सप्लांटेशन या सायंस जर्नलमध्येही प्रकाशित करण्यात आला आहे.

साध्या वाटणाऱ्या 'या' ७ लक्षणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो हृदयाचा गंभीर आजार; वेळीच सावध व्हा

डॉ. नायक म्हणाले की, अभ्यासाच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की कोविड संसर्गामुळे बरे झालेले रुग्ण कोणत्याही भीतीशिवाय अवयव दान करू शकतात. कोविड -१९ च्या युगात, जेव्हा लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या भीती निर्माण होत आहेत, तेव्हा हा अभ्यास अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी खूप आरामदायक असू शकतो. हे किडनी निकामी झालेल्या रूग्णांना नवीन आशा देते.

समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....

अभ्यासानुसार असे म्हटले गेले आहे की अवयवदानामुळे कोरोनो व्हायरसचा धोका कमी झाला आहे. कारण बहुतेक दाते चाचणीच्या वेळी  एसिम्टोमॅटिक होते. त्याच वेळी, ज्यांना कोविडची सौम्य लक्षणे आहेत त्यांना २ दिवसांनंतर दोन नकारात्मक पीसीआर चाचण्यांनंतर किडनीतून दान केले गेले. कोविड -१९ च्या सर्व प्रोटोकॉलचे पालन केल्यावरच अवयवांच्या प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण झाली. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या