CoronaVirus News : क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 02:01 AM2020-05-22T02:01:10+5:302020-05-22T02:01:28+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या खेळाडूंनी हे करणे थांबवले की इतर ठिकाणी हे आपोआप थांबेल. कारण बऱ्याचदा छोट्या प्रमाणावर खेळताना असे नक्कल म्हणून केले जाते.

CoronaVirus News: Do not use spit when turning cricket balls, notes and pages | CoronaVirus News : क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको

CoronaVirus News : क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको

googlenewsNext

अनेक वर्षांच्या सवयीप्रमाणे अनेक कारणांसाठी थुंकीचा वापर करण्याची आपल्याला सवय लागली आहे. पण कोरोनानंतर आता ही सवय बदलावी लागणार आहे. याचे कारण थुंकीतून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो आणि ज्या गोष्टीसाठी थुंकी वापरली ती कोरोना पसरवण्यासाठी वाहक ठरू शकते. पुढील गोष्टी करताना थुंकीचा वापर थांबवा.
- क्रिकेट खेळताना सुरुवातीच्या ओव्हर्स संपल्यावर चेंडू प्रभावीपणे रिवर्स स्विंग व्हावा म्हणून खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी घाम किंवा थुंकीचा वापर करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो म्हणून आयसीसीने चेंडू चमकवण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. या ऐवजी ओव्हर संपल्यावर अम्पायरसमोर चेंडू चमकवण्यासाठी कृत्रिम पदार्थ उपलब्ध करून देण्याची तयारी आयसीसीने केली आहे. त्यामुळे खेळाडूंनी असा थुंकी व घामाचा वापर चेंडू चमकवण्यासाठी बंद करावे. आंतरराष्ट्रीयच नव्हे तर स्थानिक व गल्लीत मुले खेळत असलेल्या क्रिकेटमध्येही हा नियम पाळला जावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या खेळाडूंनी हे करणे थांबवले की इतर ठिकाणी हे आपोआप थांबेल. कारण बऱ्याचदा छोट्या प्रमाणावर खेळताना असे नक्कल म्हणून केले जाते.
- बँकेमध्ये किंवा घरात नोटा मोजताना थुंकीचा वापर करू नका.
- पाकिटे, पोस्ट स्टॅम्प, कोर्टातील फी स्टॅम्प चिटकवण्यासाठी थुंकीचा वापर नको. दिल्ली हायकोर्टाने कोर्टात थुंकीचा वापर न करण्या विषयी आदेश काढला आहे.
- यासाठी बँकेत, कोर्टात, मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत, वाचनालये उघडल्यावर तिथेही प्रत्येक टेबलसमोर स्पंजचे तुकडे ओले करून ठेवायला हवे. हे स्पंज ओले करण्यासाठी पाण्याऐवजी हँड सॅनिटायजरचा वापर करता येईल.

- अमोल अन्नदाते
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title: CoronaVirus News: Do not use spit when turning cricket balls, notes and pages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.