शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! या देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार; आरोग्यमंत्र्याचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 12:09 IST

CoronaVirus News & Latest Updates : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संक्रमणाच्या प्रकरणात २०० टक्क्यांनी वाढ  झालेली पाहायला मिळाली. याचे प्रमुख कारण सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या सभा हे होतं. 

सौदी अरेबियात कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरण अभियान सुरू असतानाच माहामारीच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढत आहे. आरोग्यमंत्री तैफिन अल रबिया यांनी दिलेल्या माहितीनुसार सौदी अरेबियात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे.  म्हणूनच लोकांनी माहामारीचा प्रसार थांबवण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. दर आठवड्याला संक्रमणाच्या नवीन केसेस समोर येत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संक्रमणाच्या प्रकरणात २०० टक्क्यांनी वाढ  झालेली पाहायला मिळाली. याचे प्रमुख कारण सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या सभा हे होतं. 

सौदी अरेबियामध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणं अशीच घटना वाढत राहिल्यास बर्‍याच देशांना यापूर्वी सामोरे गेलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. असा इशारा आरोग्यमंत्री तौफिग अल रबिया यांनी दिला. ते म्हणाले की, ''जर कोरोनाच्या बचाव उपायांकडे दुर्लक्ष केले गेले तर आम्हाला नक्कीच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागेल.'' सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार  सोमवारी येथे कोरोना संसर्गाची २५५ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर एका महिन्यापूर्वी दररोज केवळ ८० प्रकरणांची नोंद झाली आहे. सध्या येथे कोरोना संसर्ग तीन लाख ६८ हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, तर सहा हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.

अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की आफ्रिका खंडात कोरोना विषाणूची दुसरी लाट आहे. यासंदर्भात संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने इशारा दिला आहे आणि म्हटले आहे की साथीच्या रोगाची दुसरी लाट बर्‍याच दिवसांसाठी इथेच राहू शकेल. बर्‍याच आफ्रिकन देशांमध्ये कोरोनाचे नवीन स्ट्रेन आतापर्यंत सापडले आहे. ओव्हेरियन कॅन्सरचं कारण ठरू शकतं वजन वाढणं; महिलांनी 'या' लक्षणांकडे वेळीच द्यायला हवं लक्ष

ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचे नवीन स्ट्रेन अधिक संसर्गजन्य ठरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आतापर्यंत 70 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा स्ट्रेन 30 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. अमेरिकेत, या दोन्ही प्रकारांमधील संसर्गग्रस्त लोक आढळले आहेत, तर भारतात केवळ ब्रिटनचा स्ट्रेन लोकांच्या चितेंच कारण ठरला आहे. Brushing Tips: रोज दात घासूनही पिवळेच दिसतात? मग वेळीच जाणून घ्या योग्य पद्धत, दुर्गंधीसुद्धा होईल दूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लस