शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Hybrid version Corona : काळजी वाढली! अमेरिकेत एकत्र झाले कोरोनाचे दोन स्ट्रेन; हायब्रिड कोरोना अधिक जीवघेणा ठरणार?

By manali.bagul | Updated: February 18, 2021 16:39 IST

Hybrid version Corona News & Latest Updates : जेव्हा माणसाच्या शरीरात एकच पेशी व्हायरसच्या दोन वॅरिएंटनं संक्रमित होतात तेव्हा कोरोना व्हायरसच्या जीन्समध्ये अदबाबदल होते.

(Image Credit- Getty)

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये कोरोना व्हायरसचा एक हायब्रिड वर्जन असल्याचे समोर आले आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये मिळालेला कोरोना व्हायरसचा वेरिएंट B.1.1.7 आणि अमेरिकेतील कोरोनाचा स्ट्रेन B.1.429 एकत्र मिळाले असून आता कोरोनाचं  हायब्रिड वर्जन तयार झालं आहे. ब्रिटन आणि अमेरिका या देशात आढळेल्या कोरोनाचे स्ट्रेन मिळून हा हायब्रिड वेरिएंट तयार झाला आहे. या  हायब्रिड स्ट्रेनला आतापर्यंत कोणतंही नाव देण्यात आलेलं नाही. आतापर्यंत एका रुग्णांत हा हायब्रिड स्ट्रेन दिसून आला आहे. आता या स्ट्रेनची अधिक प्रकरणं समोर येण्याची भीती तज्ज्ञांना आहे. 

डेली मेलनं दिलेल्या रिपोर्टनुसार वैज्ञानिकांनी सांगितले की, ''जेव्हा माणसाच्या शरीरात एकच पेशी व्हायरसच्या दोन वॅरिएंटनं संक्रमित होतात तेव्हा कोरोना व्हायरसच्या जीन्समध्ये अदबाबदल होते. त्यामुळे नवीन वेरिएंट तयार होतो. '' वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जर एखाद्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या व्हायरसच्या स्ट्रेनचं संक्रमण झालं तर हायब्रिड वेरिएंट तयार होण्याचा धोका असतो. दरम्यान देशात कोरोनाचे अनेक स्ट्रेन समोर आले आहेत.

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोनाची स्ट्रेन अधिक संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे. तज्ज्ञांनी याआधीही धोक्याची सुचना दिली होती की, कोरोनाचा हायब्रिड वेरिएंट तयार होऊ शकतो.  अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी सार्वजनिक स्तरावर कोणतीही माहिती दिलेली नाही. कोरोना हायब्रिड वैरिएंटनं संक्रमित व्यक्ती आढळल्यानंतर याबाबत खुलासा करण्यात आला आहे. हायब्रिड वेरिएंटमुळे कोरोना रुग्ण अधिक आजारी पडत आहेत. 

दक्षिण आफ्रिकेच्या धोकादायक कोरोना स्ट्रेनचा भारतात शिरकाव

भारतात ब्रिटनमधील कोरोना व्हायरसनंतर आता दक्षिण आफ्रिकेतील नव्या स्ट्रेनचा शिरकाव झाला आहे. या नव्या स्ट्रेनची ५ प्रकरणं सध्या समोर आलं आहे. या प्रकरणात सगळ्यांनाच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या पाच जणांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीदेखील चाचणी करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमध्ये ब्रिटनच्या स्ट्रेननंतर आता दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलचा स्ट्रेन समोर आला आहे. आसयीएमआरचे प्रमुख तज्ज्ञ बलराम भार्गव यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सार्स कोव-२ च्या ब्राझिलमधील स्ट्रेनबाबत माहिती मिळाली असल्याचे सांगितले आहे.

लसीच्या परिणामकतेचा अभ्यास करण्यासाठी सध्या तज्ज्ञांचे परिक्षण सुरू आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलचा वेरिएंट ब्रिटनच्या स्ट्रेनपेक्षा वेगळा आहे. आयसीएमआरकडून समोर आलेल्या माहितीनमुसार ब्रिटनमधील स्ट्रेनचे आतापर्यंत १८७ रुग्ण समोर आले आहेत. ब्रिटनच्या नव्या स्ट्रेननं संक्रमित असलेल्यांपैकी एकालाही मृत्यूचा सामना करावा लागलेला नाही.

सगळ्या पॉझिटीव्ह रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. अनेक लस कंपन्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या कंपनीची लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला नष्ट करण्यासाठी परिणामकारक ठरू शकते. OMG! लसीवर भरवसा नाही; म्हणून कोरोनापासून बचावासाठी ती चक्क प्यायली स्वतःचं मुत्र

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, ''ब्रिटनहून आलेल्या नागरिकांना आरटी पीसीआर चाचणी करणं अनिवार्य आहे. जे लोक पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचे जीनोम सिक्वेन्स अनुक्रमण केलं जात आहे. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलच्या विमान उड्डानंसाठी या नियोजनाचा अवलंब केला जात आहे.'' ४४ देशामध्ये दक्षिण आफ्रिकेचा स्ट्रेन पसरल्याचं सांगितलं जात आहे. हादरवणारी बातमी! दक्षिण आफ्रिकेच्या धोकादायक कोरोना स्ट्रेनचा भारतात शिरकाव; अधिक सर्तक राहावं लागणार

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस