शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

सावधान! हवेतून वेगाने होतोय कोरोनाचा प्रसार, CDC च्या तज्ज्ञांनी दिली धोक्याची सुचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 19:15 IST

CoronaVirus News & Latest Updates : सीडीसीच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे की, लहानात लहान ड्रॉपलेट्स आणि कणांच्या संपर्कात आल्यामुळे हवेद्वारे संक्रमण वेगाने पसरते.  

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून दिवसेंदिवस धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. अमेरिकेची प्रमुख आरोग्यसंस्था सीडीसीने (Centers for Disease Control and Prevention) कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत नवीन  गाईडलाईन्स दिल्या आहेत. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचा प्रसार हवेच्या माध्यमातूनही होऊ शकतो. याआधीही सीडीसीने याबाबत माहिती  दिली होती. 

टाईम्स ऑफ इंडीयाने  दिलेल्या वृत्तानुसार नवीन गाईडलाईन्सनुसार सीडीसीच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे की, लहान लहान ड्रॉपलेट्स आणि कणांच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमण वेगाने पसरते.  हवेत हे ड्रॉपलेट् किंवा व्हायरसचे कण दीर्घकाळ तसेच राहिल्यामुळे लोकांना संक्रमणाचा धोका असतो. लोक संक्रमित व्यक्तीपासून ६ फुटांच्या अंतरावर असतानाही संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो. 

सीडीसीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

व्हायरसच्या या प्रकारच्या प्रसाराला एअरबोर्न ट्रांसमिशनच्या नावाने ओळखलं जातं. कोरोनाशिवाय इतर जीवघेणे आजारही या माध्यमातून पसरण्याचा धोका असतो. व्हेंटिलेशन नसलेल्या ठिकाणी, पुरेशी हवा खेळती नसलेल्या ठिकाणी या प्रकारचे संक्रमण मोठ्या प्रमाणात परसण्याचा धोका असतो. व्यायाम करताना, बोलताना, हसताना  सुरक्षित अंतर न पाळल्यास ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून कोरोना संक्रमणाचा धोका वाढतो. कोरोना संक्रमित व्यक्ती एखाद्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी जात असलेल्या इतर लोकांनाही कोरोनाचा धोका जास्त असतो. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार  एअरबोर्न ट्रांसमिशनपासून बचाव करणं महत्वाचे आहे. कारण कोरोना संक्रमित व्यक्तीकडून श्वास घेताना, बोलताना  हजारोंच्या संख्येने व्हायरसने भरलेले एअरोसोल्स बाहेर येत असतात. अनेकदा तोंडातून किंवा नाकातून बाहेर येत असलेले ड्रॉपलेट्स  इतके लहान असतात की डोळ्यांना दिसूही शकत नाहीत.

अनेकदा हे ड्रॉपलेट्स सुकतात.  ड्रॉपलेट्स संक्रमित व्यक्तीकडून जितक्या दूर जातात तितकंच ड्रॉपलेट्स कॉन्संट्रेशनही कमी होतं. गुरूत्वाकर्षणामुळे मोठे ड्रॉपलेट्स जमीनीवर पडतात. तर लहान ड्रॉपलेट्स हवेत पसरतात. सीडीसीच्या नवीन गाईडलाईन्सनुसार  ६ फुटांच्या अंतरावरूनही संक्रमित व्यक्ती इतरांपर्यंत कोरोनाचं संक्रमण पसरवू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.  दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....

उपाय

हवेतून संसर्गाची शक्यता ही बंद जागेत जास्त लोक जमल्यावरच असल्याने हे टाळावे व कामाच्या ठिकाणी शक्यतो दार, खिडक्या उघडी ठेवावी. लग्नसमारंभ, धार्मिक स्थळ, बार अशा बंद जागेत जास्त गर्दी होते अशी ठिकाण जाणे टाळावे. हवेतून संसर्गाची शक्यता गृहीत धरली तरी सर्वांनी मास्क वापरल्यास बचाव होईलच. सोशल डिस्टन्सिंग पाळणे सुरू ठेवावे. या गोष्टी पाळल्या तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो. लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य