शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

दिलासादायक बातमी! एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना संक्रमणाचा धोका कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 21:39 IST

आपल्याला एकापेक्षा अधिक वेळा कोरोना संक्रमण होऊ शकते का, यासंदर्भात लोक अत्यंत चिंतित आहेत. हे अम्हालाही माहित आहे की, लोक एकहून अधिक वेळा कोरोना संक्रमित होऊ शकतात. पण...

लंडन - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच इंग्लंडच्या आरोग्य विभागाकडून दिलासादायक वृत्त आले आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडने (PHE) कोरोना व्हायरसच्या रिइंफेक्शनसंदर्भातील एक डेटा गुरुवारी जारी केला. यात, एकदा कोरना संक्रमण झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा संक्रमण होण्याचा धोका कमी आहे, असे नव्या डेटावरून समोर आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा डेटा दुसऱ्यांदा कोरना संसर्ग झालेल्या लोकांवर लक्ष ठेवणे आणि आजाराचे वर्तन समजून घेण्यासाठी सार्वजनिक करण्यात आला आहे.

दुसऱ्यांदा संक्रमित होणाऱ्या लोकांची संख्या कमी - या अहवालात दावा करण्यात आला आहे, की दुसऱ्यांदा कोरोना संक्रमण झालेल्या लोकांची संख्या अत्यंत कमी आहे. इंग्लंडमध्ये महामारीच्या सुरुवातीपासून ते 30 मे 2021 पर्यंत 15,893 लोकांनाच दुसऱ्यांदा कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान संपूर्ण इग्लंडमध्ये एकूण 40 लाख लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. 

लोकांच्या मनात दुसऱ्यांदा संक्रमित होण्याची भीती -पब्लिक हेल्थ इंग्लंडमधील कोरोना स्ट्रॅटजिक डायरेक्टर डॉ. सुसान हॉपकिंस यांनी म्हटले आहे, की "आपल्याला एकापेक्षा अधिक वेळा कोरोना संक्रमण होऊ शकते का, यासंदर्भात लोक अत्यंत चिंतित आहेत. हे अम्हालाही माहित आहे की, लोक एकहून अधिक वेळा कोरोना संक्रमित होऊ शकतात. मात्र, भविष्यात दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे, असे हा डेटा दर्शवतो. मात्र, यासंदर्भात आम्ही असंतुष्ट आहोत.

दुसऱ्यांदा संक्रमित झालेल्या लोकांत लक्षणे दिसत नाहीत - ते म्हणाले, कुठल्याही संक्रमणाची शक्यता कमी करण्यासाठी लशींचे दोन्ही डोस आणि दरवेळा मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. हा डेटा जून 2020 ते मे 2021 अखेरपर्यंतच्या रिइंफेक्शनची शक्यता दर्शवतो. असे असले तरी, आम्ही दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित झालेल्या लोकांवर लशीचा प्रभाव आणि आजाराचे गांभीर्य यांवर लक्ष ठेऊ. तसेच दुसऱ्यांदा कोरोना झालेल्या अधिकांश रुग्णांत लक्षणे दिसत नाहीत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEnglandइंग्लंड