शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : काळजी वाढली! वाढत्या तापमानाचा कोरोना विषाणूंवर परिणाम होत नाही, तज्ञांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 10:10 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: या संशोधनात दिसून आलं की, कोरोना व्हायरस आणि वातावरणातील तापमान यांचा काहीही संबंध नाही.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार पसरला आहे. कोरोनाच्या माहामारीवर उपाय शोधण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. कारण कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या अडीच लाखांपेक्षा जास्त झाली आहे.  उन्हाळा सुरू झाल्यानंतर तापमान वाढणार आणि त्यामुळे कोरोना जास्त काळ टिकू शकणार नाही. असा अंदाज काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता. 

अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात तापमान आणि कोरोना व्हायरसबाबत माहिती दिली आहे. याबाबतची माहिती कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. हे संशोधन ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडाच्या राज्यांमध्ये करण्यात आल होतं.  संशोधकांच्यामते इटली, इराण आणि दक्षिण कोरिया या देशांच्या तुलनेत चीनमध्ये कोरोना व्हायरसचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. म्हणजेच चीनमध्ये हा व्हायरस हळूहळू नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे. 

टोरंटो युनिव्हरसिटी आणि कॅनडामधील सेंट मायकल रुग्णालयातील तज्ञ पीटर जूनी यांनी सांगितले की,  कोरोनाच्या महामारीवर संशोधन करण्यासाठी  जगभरातील माहितीचा वापर केला जात आहे. यासाठी संशोधकांनी २७ मार्च ते २० मार्च या कालावधीमधील रुग्णांची तुलना केली.  त्यांनी १३ मार्चला त्यांनी लॉकडाऊनदरम्यानच्या सामाजीक स्थितीचा आढावा घेतला  त्यावेळी लोक एकत्र न होणं, शाळा बंद असणं. यामुळे कोरोना व्हायरसच्या प्रसारावर परिणाम दिसून आला. (हे पण वाचा-उन्हाळ्यात आजारी पडायचं नसेल; तर व्हिटॅमीन 'सी' मुळे शरीराला होणारे फायदे वाचा)

या संशोधनात दिसून आलं की, कोरोना व्हायरस आणि वातावरणातील तापमान यांचा संबंध नाही. वाढत्या तापमानामुळे कोरोनाच्या प्रसारावर काहीही परिणाम दिसून आला नव्हता. गरमीच्या वातावरणाचा कोरोनाच्या व्हायरसवर काहीही परिणाम घडून येत नाही. हे या रिसर्चमध्ये स्पष्ट झालं.  

(हे पण वाचा-CoronaVirus News : शारीरिक संबंधांमुळे कोरोना होण्याची भीती; स्पर्म्समध्ये सापडला विषाणू)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स