उन्हाळ्यात आजारी पडायचं नसेल; तर व्हिटॅमीन 'सी' मुळे शरीराला होणारे फायदे वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:12 PM2020-05-07T19:12:40+5:302020-05-07T19:22:24+5:30

शरीराला पोषण मिळण्यासाठी आणि आजारांशी लढण्याासाठी व्हिटॅमीन्सची गरज असते.

Benefits of Vitamin C for health and skin myb | उन्हाळ्यात आजारी पडायचं नसेल; तर व्हिटॅमीन 'सी' मुळे शरीराला होणारे फायदे वाचा

उन्हाळ्यात आजारी पडायचं नसेल; तर व्हिटॅमीन 'सी' मुळे शरीराला होणारे फायदे वाचा

Next

आहारात आपण वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करत असतो. सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत असल्यामुळे आपण घरच्याघरी चांगला आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती चांगली बनवू शकतो. शरीराला पोषण मिळण्यासाठी आणि आजारांशी लढण्याासाठी व्हिटॅमीन्सची गरज असते. आम्ही तुम्हाला व्हिटॅमीन सी चे फायदे आणि व्हिटॅमीन सी कशातून मिळतं याबाबत माहिती देणार आहोत. 

ताण- तणाव

कोरोनाचा ताण आणि वैयक्तीक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर अशा लोकांसाठी व्हिटॅमिन सी फायदेशीर ठरू शकतं,  जे लोक जास्त मद्यपान, धूम्रपान करतात, ज्यांना लठ्ठपणा बळावला आहे त्यांच्यामध्येही व्हिटॅमिन सीची कमतरता असू शकते. त्यासाठी चांगला आहार घेतल्यास कमतरता भरून काढता येऊ शकते.

सर्दी- ताप

सध्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. साधा ताप आला तरी कोरोनामुळे लोक घाबरतात.  फ्लूसारख्या लक्षणांपासून आराम देण्यात व्हिटॅमीन सी मदत करू शकतं. जेणेकरून ते इतर गंभीर आजारांचं रूप घेणार नाही. आहारात मध, राजगीरा अशा पदार्थांचा आहारात करून तुम्ही व्हिटॅमीन सी मिळवू शकता.

(हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये लठ्ठपणाचे शिकार होण्यापेक्षा मेंटेन राहण्यासाठी रोज 'या' गोष्टींकडे लक्ष द्या)

त्वचेच्या समस्या दूर होतात

उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. त्वचा तेलकट होणं,  पिंपल्स येणं यांसह त्वचा विकारांचा सामना करावा लागतो.  शरीरात व्हिटॅमीन सी पुरेशा प्रमाणात असल्यास त्वचेच्या समस्या बळावत नाहीत, त्वचेवर नैसर्गिक कोमलता कायम राहते. व्हिटॅमीन सीमुळे सूज, स्नायूचं होणारं नुकसान कमी होतं. आंबट फळं व्हिटॅमीन सीचा प्रमुख स्रोत आहेत. याशिवाय ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, आंबा, पपई, फ्लॉवर, कोबी यातूनही व्हिटॅमीन सी मिळतं. त्यामुळे यांचा आहारात समावेश करा.

(हे पण वाचा-फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी 'या' ४ पदार्थांचा करा वापर)

Web Title: Benefits of Vitamin C for health and skin myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.