शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : भारतात लसीशिवाय नष्ट होतेय कोरोनाची महामारी? तज्ज्ञांनी सांगितलं की.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 14:56 IST

CoronaVirus News & Latest Updates : आतापर्यंत ९३ लाख २४ हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. ही आकडेवारी पाहून कोरोनाच्या लसीशिवाय माहमारी नष्ट होण्याच्या मार्गावर येत आहे. असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

जगभरात कोरोना व्हायरसच्या माहामारीने कहर केला आहे. आतापर्यंत ७ कोटी २१ लाखांपेक्षा जास्त लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत १६ लाखांपेक्षा अधिक लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. भारतातही संक्रमितांचा आकडा ९८ लाखांवर पोहोचला आहे. भारतात कोरोनातून बरे झालेल्यांचा दर ९४.८९ टक्के इतका आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९३ लाख २४ हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. ही आकडेवारी पाहून कोरोनाच्या लसीशिवाय माहमारी नष्ट होण्याच्या मार्गावर येत आहे. असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

दिल्लीतील सफरजंग रुग्णालयातील डॉ. रूपाली मलिक यांनी अमर उजालाशी बोलताना सांगितले की, कोरोना व्हायरसचा प्रसार आता आटोक्यात आला आहे. असा विचार अनेकजण करत आहेत. पण आतापर्यंत काहीही निश्चित झालेलं नाही. या माहामारीवर आपण विजय मिळवला असं समजणं एवढ्यात योग्य ठरणार नाही. कारण देशात अनेक अशी राज्य आहेत. जिथं कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट दिसून येत आहे. तीन मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारकशक्ती विकसित झाली आहे. लसीबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. असं असलं तरी लहानात लहान गोष्टीत दाखवलेला निष्काळजीपणा महागात पडू शकतो.

डॉ. रूपाली मलिक यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये फायजरच्या कोरोना लसीचे १२ वर्षांवरील लोकांवर परिक्षण सुरू आहे. जगभरात अजून काही लसींची तपासणी सुरू आहे. १८ वर्षांवरील वयोगटातील लोकांसाठी नवीन लस दिली जाणार आहे. सध्या लहान मुलांसाठी  लसीकरण योजना तयार करण्यावर भर दिला जात आहे.लस तयार करण्यासाठी ज्या पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे एलर्जीचा सामना करावा लागू शकतो. अनेकांमध्ये ही माईल्ड स्वरूपाची एलर्जी असते. तर काही लोकांमध्ये गंभीर स्वरूपात एलर्जीची लक्षणं दिसून येतात. चिंता वाढली! कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर; 'या' ५ Genes च्या लोकांना धोका जास्त

एनाफायलॅक्सिसमध्ये ही एलर्जी गंभीर स्वरूपाची असू शकते. ज्या लोकांना एलर्जीच्या समस्येचा सामना करावा लागतो  त्यांनी लस घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. याआधीही ज्या लसी आल्या होत्या. त्यात  आजाराला रोखण्याची क्षमता ५०-५० टक्के होती. लस १०० टक्के प्रभावी ठरेल की नाही याबाबत सांगणं कठीण आहे. अजूनही लसीच्या परिणामांबाबत अधिक अभ्यास सुरू आहे. काळजी वाढली! समोर आलं कोरोना संक्रमणाचं नवं लक्षणं; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य