शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात घश्यातील खवखवीमुळे कोरोनाचा धसका घेण्याआधी; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 18:24 IST

कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी आजारी पडली असेल तर भीतीचं वातावरण तयार होत आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून जगभरासह भारतात सुद्धा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आता पावासाला सुरूवात झाली आहे. दरवर्षी पावसाळ्याची सुरूवात झाली की वातावरणातील बदलांमुळे लोकांना सर्दी, खोकला, ताप, अंग दुखीच्या समस्या उद्भवतात. पण यावर्षी कोरोनाच्या माहामारीचं संक्रमण सर्वत्र पसरल्यामुळे लोकांना आजारी पडण्याची धास्ती वाटते. कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी आजारी पडली असेल तर भीतीचं वातावरण तयार होत आहे. 

नेहमी घाबरण्यासारखीच स्थिती असते. असं नाही. तुम्ही घरच्याघरी रोज आहारातून पोषक घटकांचे सेवन करून स्वतःची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता आणि आजारांना स्वतःपासून लांब ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला कोरोना व्हायरसपासून बचावासाठी तसंच घसा खवखवण्याच्या समस्येचा दूर ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा याबाबत सांगणार आहोत. 

हळदीचं दुध

हळद ही औषधी मानली जाते. हळदीत अँटिमायक्रोबिअल घटकही असतात. त्यामुळे फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि जखम भरण्यासाठीच नव्हे तर घशाच्या खवखवीवरही हळद उपयुक्त आहे. त्यामुळे कोमट दुधात हळद मिक्स करून सेवन करा.

कोमट पाणी

अनेक आजार हे शरीरात पाण्याची कमतरता असल्यास म्हणजे डिहायड्रेशनमुळे उद्भवतात. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. मात्र घशाची खवखव दूर करण्यासाठी कोमट पाणी प्या. डिहायड्रशेन झाल्यास वेळेवर वेळेवर औषधं न घेतल्यास हीट स्ट्रोकचा धोका असतो, काही लक्षणांकडे लक्ष देणं गरजेच आहे. डोळ्यांसमोर अंधार येणं, सतत चक्कर येणं ही डी हायड्रेशनची लक्षणं आहेत. 

लवंग

 लवंगाच्या पाण्याने तुम्ही गुळण्याही करू शकता. लवंगामध्ये असा घटक असतो जो नैसर्गिक पेनकिलर आणि अँटिमायक्रोबिअल म्हणून काम करतो. लवंगाची पूड करून पाण्यात टाकून उकळू घ्या. लवंग घातलेलं असं कोमट पाणी प्या.

मध

घसा खवखवत असेल तर एक चमचा मध तुम्ही असंच पिऊ शकता. कोमट पाण्यात मध आणि लिंबूरस टाकूनही पिऊ शकता.

आलं 

आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. आलं हे खवखवणाऱ्या घशासाठी उत्तम असा नैसर्गिक घटक आहे.  आलं किसून दोन कप पाण्यात टाकून हे पाणी उकळून घ्या. पाणी गाळून प्या. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मध आणि लिंबूरस टाकू शकता.

शिंकण्याचं हे नवं तंत्र शिकावंच लागेल भाऊ... कारण आपल्याला रोगाशी लढायचंय!

तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाही कोरोना विषाणू; जर लक्षात ठेवाल 'या' ५ गोष्टी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य