Coronaviru : उपचारासाठी किती फायदेशीर आहे प्लाज्मा थेरपी? वाचा जगप्रसिद्ध डॉक्टर काय म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:04 AM2020-04-22T10:04:47+5:302020-04-22T10:04:58+5:30

डॉक्टर इयान लिपकिन यांनी इंडिया टुडेचे राहुल कंवल यांना दिलेल्या खास मुलाखतीत कोरोना व्हायरस, वॅक्सीन याबाबत चर्चा केली.

Coronavirus : Famous Virologist doctor Ian Lipkin talks about plasma therapy covid-19 api | Coronaviru : उपचारासाठी किती फायदेशीर आहे प्लाज्मा थेरपी? वाचा जगप्रसिद्ध डॉक्टर काय म्हणाले..

Coronaviru : उपचारासाठी किती फायदेशीर आहे प्लाज्मा थेरपी? वाचा जगप्रसिद्ध डॉक्टर काय म्हणाले..

Next

जगातले प्रसिद्ध वॉयरोलॉजिस्ट आणि कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत विजय मिळवणारे डॉक्टर इयान लिपकिन यांनी कोरोनाला नष्ट करण्यासाठी चर्चेत आलेल्या प्लाज्मा थेरपीबाबत महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, काही आठवड्यातच ही थेरपी किती फायदेशीर ठरेल हे कळू शकेल. लिपकिन हे प्लाज्मा थेरपीचे मोठे समर्थक आहेत.

व्हायरसवर तयार करण्यात आलेल्या 'कॅंटेजियन' या हॉलिवूड सिनेमासाठी सल्लागार टीममध्ये असलेले डॉक्टर इयान लिपकिन यांनी इंडिया टुडेचे राहुल कंवल यांना दिलेल्या खास मुलाखतीत याबाबत चर्चा केली. ते म्हणाले की, 'मी प्लाज्मा थेरपीसाठी उत्साहित आहे आणि याचं समर्थन करतो. तुम्ही सुद्धा कोरोनातून बरे झाले असाल तर तुमचा प्लाज्मा दान करा'.

लिपकिन म्हणाले की, कोरोनावर नियंत्रणासाठी वॅक्सीनची फार गरज आहे. आपल्याला तात्काळ वॅक्सीनची गरज आहे. अपेक्षा आहे की, वर्षाच्या शेवटपर्यंत वॅक्सीन तयार होईल. व्हायरस आणखी वाढू शकतो, अशात वॅक्सीन तयार करणं गरजेचं आहे.

त्यांचं असं मत आहे की, जगातले अनेक देश आणि मोठ्या कंपन्या वॅक्सीन तयार करण्यात बिझी आहेत. पण त्यांनी असाही दावा केला की, रिसर्च करणाऱ्या लोकांनी त्यांना सांगितले की, वॅक्सीन तयार व्हायला आजपासून 18 महिने लागू शकतात.

भारतात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी करण्यासाठी करण्यात आलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या लॉकडाऊनचं कौतुक करत ते म्हणाले की, लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी आक्रामकपणे टेस्टिंग आणि लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याची रणनीति कामात येऊ शकते.

लिपकिन चीनमध्ये कोरोना व्हायरस समोर आल्यावर अभ्यासासाठी जानेवारीत चीनला गेले होते. ते म्हणाले की, कोरोना रोखण्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे सोशल डिस्टंसिंग हाच आहे. 

(Image Credit : safetyandhealthmagazine.com)

जगभरात प्रसिद्ध असलेले डॉक्टर लिपकिन म्हणाले की, कोरोनाच्या उपचारासाठी वॅक्सीन फार गरजेची आहे आणि ती लवकरात लवकर तयार केली जावी. पण जोपर्यंत वॅक्सीन तयार होत नाही, तोपर्यंत काळजी घेणे हाच उपाय आहे. 

2003 मधे सार्ससोबत लढण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि चीनची मदत करणारे डॉ.इयान लिपकिन म्हणाले की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनने किती फायदा होईल याबाबत काही माहिती नाही. हे अजून सिद्ध झालं नाही की, कोरोना विरोधातील लढाईत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन किती प्रभावी ठरेल. ते म्हणाले की, जेव्हा ते कोरोनाने पीडित झाले होते तेव्हा त्यांनी स्वत:ही हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेतलं नव्हतं.

Web Title: Coronavirus : Famous Virologist doctor Ian Lipkin talks about plasma therapy covid-19 api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.