CoronaVirus News: कोरोनामुक्त झालेल्यांचे दात पडू लागल्यानं चिंतेत वाढ; डॉक्टरांसह सगळेच हैराण

By कुणाल गवाणकर | Published: December 22, 2020 09:44 AM2020-12-22T09:44:32+5:302020-12-22T09:44:49+5:30

CoronaVirus News: कोरोनावर मात केलेल्यांना सतावतेय नवीन समस्या; डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा

CoronaVirus covid 19 survivors facing odd symptom of teeth falling out after being recovered | CoronaVirus News: कोरोनामुक्त झालेल्यांचे दात पडू लागल्यानं चिंतेत वाढ; डॉक्टरांसह सगळेच हैराण

CoronaVirus News: कोरोनामुक्त झालेल्यांचे दात पडू लागल्यानं चिंतेत वाढ; डॉक्टरांसह सगळेच हैराण

googlenewsNext

मुंबई: संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही देशांनी लसीकरणास सुरुवात केली आहे. अमेरिका, ब्रिटन सरकारनं लसीकरणास परवानगी दिली आहे. त्यातच आता ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त धोकादायक असल्यानं संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमानं रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला असताना दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संकट पाहून दातखिळीच बसली, असं आपण अनेकदा म्हणतो. मात्र कोरोनामुळे आलेल्या नव्या संकटामुळे आता तसंदेखील म्हणण्याची सोय उरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. माणसाच्या फुफ्फुसांवर थेट हल्ला चढवणाऱ्या कोरोनानं आता दातांवर आक्रमण केलं आहे. काही कोरोना बाधितांचे दात कमजोर होत असून ते पडत असल्याचं वृत्त 'न्यूयॉर्क टाईम्स'नं दिलं आहे.

सतत मास्कचा वापर करणं ठरू शकतं नुकसानकारक; डॉक्टरांनी सांगितले 'हे' दुष्परिणाम

काय आहे संपूर्ण घटना?
न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असलेल्या ४३ वर्षीय फराह खेमिली यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या पूर्ण बऱ्या झाल्या. मात्र एके दिवशी त्यांना दातांमध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांनी दातांना हात लावून पाहिला. त्यावेळी एक दात हलत असल्याचं लक्षात आलं. दुसऱ्याच दिवशी फराह यांचा दात पडला. हे पाहून त्यांना धक्काच बसला. विशेष म्हणजे दात पडताना त्यांना कोणतीही वेदना जाणवली नाही आणि रक्तस्रावदेखील झाला नाही.

आधीपेक्षा जास्त घातक ठरू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन; संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली, तज्ज्ञांचा दावा

संशोधक आणि दंतचिकित्सकांमध्ये मतमतांतरं
या घटनेनंतर संशोधकांनी यावर संशोधन सुरू केलं. कोरोनाची लागण झाल्याचा परिणाम दातांवर होतो, अशी कोणतीही बाब अद्याप तरी संशोधनातून समोर आलेली नाही, असं संशोधकांनी सांगितलं. मात्र कोरोना विषाणूचा परिणाम दातांवर होतो, असं मत काही दंतचिकित्सकांनी व्यक्त केलं. मात्र त्यांच्याकडे याचा कोणताही पुरावा नाही.

याशिवाय कोरोनावर मात केलेल्या न्यूयॉर्कमधील काही जणांना केसगळतीचा त्रास होऊ लागला आहे. याशिवाय काहींच्या पायांची बोटं सुजली आहेत.

दात पडणं गंभीर समस्या
एखाद्या व्यक्तीचा दात अचानक पडणं अतिशय आश्चर्यजनक असल्याचं मत उटाह विद्यापीठातील पीरियडॉन्टिक्स डॉ. डेव्हिड ओकानो यांनी व्यक्त केलं. ही समस्या पुढे आणखी गंभीर स्वरुप धारण करू शकते, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.

Web Title: CoronaVirus covid 19 survivors facing odd symptom of teeth falling out after being recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.