शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

चिंताजनक! महाराष्ट्रातील 'या' 3 शहरात वाढतोय कोरोनाचा धोका; अधिक सावध राहावं लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 18:29 IST

CoronaVirus News & Latest Updates : विदर्भात (vidarbha) कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला आहे.  राज्यातील काही भागात दिलासादायक वातावरण असताना दुसरीकडे मात्र चिंताजनक वातावरण आहे.

कोरोना व्हायरसनं गेल्या  वर्षांपासून कहर केलेला पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे.  मुंबई (mumbai coronavirus), पुण्यात थैमान घालणाऱ्या कोरोनानं (coronavirus) आता आपलं केंद्र बदललं आहे. आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट (corona hotspot) समोर आले आहे. राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार नंदुरबार, सातारा, अमरावती, नागपूर, नाशिक ही पाच ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. तर विदर्भात (vidarbha) कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला आहे. राज्यातील काही भागात दिलासादायक वातावरण असताना दुसरीकडे मात्र चिंताजनक वातावरण आहे. अकोला, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.

 4 जानेवारीला राज्यात 48,801 सक्रिय रुग्ण होते तर 3 फेब्रुवारीला 37,516 रुग्ण होते. म्हणजेच महिनाभरात ही संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. पुणे, ठाण्यासह 21 जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. पण इतर 14 जिल्ह्यात हे प्रमाण वाढलं आहे. यात  सांगली, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

अमरावतीत 

अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. 1 फेब्रुवारी रोजी हे प्रमाण 22 टक्के होतं तर आता सोमवारी ज्या 419 लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 235 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे हे प्रमाण 56 टक्क्यांवर गेलं आहे. 

नागपूर

मंगळवारी नागपुरात 379 नवीन रुग्णाची नोंद झाली असून यात 5 रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णाच्या वाढीचा टक्का 2.52 असताना नागपूरमध्ये हा दर 3.08 टक्के आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण असून काल केंद्रीय पथकाने विदर्भाचा आढावा घेतला तेव्हा नागपूरमधील वाढती कोरोनाच्या संख्या आणि उपयोजना यावर चिंता व्यक्त केली. सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होत नाही? मग गॅस, पोटदुखीची चिंता सोडा, या उपायांनी समस्या होईल दूर

दरम्यान कोव्हिड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''नुकत्याच झालेल्या बैठकीत नमुद करण्यात आलं होतं की, राज्यातील १० ते १४ जिल्ह्यांवर लक्ष द्यावं लागणार आहे.'' यावेळी त्यांनी अमरावती अकोला याबद्दल विशेष चिंता व्यक्त केली आहे. या भागांमध्ये टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि उपचारांच्या पद्धतीतही सुधारणा व्हायला हवी असं त्याचं मत आहे. लसीकरणानंतरही होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या कशामुळे होतोय प्रसार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या