coronavirus: कोरोनामुक्त झाल्यानंतरचे सहा महिने धोक्याचे, इतरांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांना मृत्यूचा धोका ६० टक्क्यांनी अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 09:38 AM2021-04-24T09:38:13+5:302021-04-24T10:55:11+5:30

coronavirus News : कोरोनाची लागण झालेल्यांनाच नाही तर कोरोनामुक्त झालेल्या लोकांनाही संसर्ग झाल्यापासून पुढचे सहा महिने मृत्यूचा धोका अधिक असतो. असे नेचर या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये संशोधकांनी सांगितले आहे. 

coronavirus: Coronavirus patients 60% higher risk of death than others, research reveals shocking information | coronavirus: कोरोनामुक्त झाल्यानंतरचे सहा महिने धोक्याचे, इतरांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांना मृत्यूचा धोका ६० टक्क्यांनी अधिक

coronavirus: कोरोनामुक्त झाल्यानंतरचे सहा महिने धोक्याचे, इतरांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांना मृत्यूचा धोका ६० टक्क्यांनी अधिक

Next

नवी दिल्ली - सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. (Coronavirus in India) दररोज लाखो लोकांना संसर्ग होत आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्यांनाच नाही तर कोरोनामुक्त झालेल्या लोकांनाही संसर्ग झाल्यापासून पुढचे सहा महिने मृत्यूचा धोका अधिक असतो. यामध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करावे न लागलेल्यांचाही समावेश आहे. ही माहिती कोरोनाबाबतच्या व्यापक संशोधनामधून समोर आली आहे. कोरोनाच्या साथीचा येणाऱ्या काळात जगभरातील लोकसंख्येवर मोठा प्रभाव पडणार आहे, असे नेचर या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये संशोधकांनी सांगितले आहे. (Coronavirus patients 60% higher risk of death than others, research reveals shocking information)

अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनमधील संशोधकांनी कोविड-१९ शी संबंधित विविध आजारांची एक यादीसुद्धा उपलब्ध केली आहे. त्यामधून या साथीमुळे दीर्घकाळात उदभवणाऱ्या त्रासाचे एक व्यापक चित्र समोर आले आहे. सुरुवातीला केवळ श्वसनाशी संबंधित आजाराचे कारण ठरलेला विषाणू पुढच्या काळात शरीरातील जवळपास प्रत्येक अवयवाला बाधि करू शकतो. 

या संशोधनामध्ये आजारपणातून सावरलेल्या तब्बल ८७ हजार कोरोनाबाधित रुग्ण आणि सुमारे ५० लाख अन्य रुग्णांचा अभ्यास केला गेला. या संशोधनाबाबत वरिष्ठ लेखक आणि मेडिसिनचे सहाय्यक प्राध्यापक जियाद अल-अली यांनी सांगितले की, कोरोनाचे निदान झाल्याच्या सहा महिन्यांनंतरही कोविड-१९ ची सौम्य लागण झालेल्यांमध्येही मृत्यूचा धोका कमी नसतो. तसेच आजाराचे गांभीर्यही वाढत जाते, असे आमच्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.  

संशोधकांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर आजाराच्या पहिल्या ३० दिवसांनंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पुढच्या सहा महिन्यांपर्यंत इतर लोकांच्या तुलनेत मृत्यचा धोका ६० टक्के अधिक असतो. या सहा महिन्यांपर्यंतच्या काळात कोरोनामुक्त झालेल्या सर्व लोकांमध्ये दर एक हजार रुग्णांमागे आठ मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये ज्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज भासते आणि जे निदान झाल्यानंतर ३० दिवसांमध्ये बरे होतात. अशा रुग्णांमध्ये दर एक हजार रुग्णांमागे २९ मृत्यू अधिक होतात, असे दिसून आले आहे. 

अल अली यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनी जागरुक राहिले पाहिजे. या रुग्णांना एकीकृत आणि व्यापक देखभालीची गरज आहे.  

संशोधकांनी रुग्णांकडून घेतलेल्या माहितीमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांवर या आजारामुळे झालेले विविध दुष्परिणाम समोर आले आहेत. या दुष्परिणामांमध्ये श्वसनाची समस्या, हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता मानसिक आरोग्याच्या समस्या आणि केसगळती यांचा समावेश आहे.  

Read in English

Web Title: coronavirus: Coronavirus patients 60% higher risk of death than others, research reveals shocking information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.