शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

कोरोनाला रोखण्यासाठी सेल थेरेपी ठरत आहे प्रभावी , 'या' दोन देशात आला पॉजिटिव्ह रिजल्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:55 AM

कोरोनाच्या उपचारांसाठी सेल थेरेपीचा वापर अनेक देशांमध्ये केला जात आहे.

चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाचं संक्रमण अमेरिका, स्पेन, इटलीसह भारतातसुद्धा मोठया प्रमाणावर पसरत गेलं आहे. कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून लोकांना वाचवण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस आणि औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वेगवेगळे प्रयोग करून कोरोनावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी सेल थेरेपीचा वापर अनेक देशांमध्ये केला जात आहे. अमेरिका आणि इस्त्राईलमध्ये या थेरेपीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. 

इस्त्राईलमध्ये सहा रुग्णांवर सेल थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. अशी माहिती एका इंग्रजी माध्यमातून देण्यात आली आहे. इस्त्राईलच्या प्लूरिस्तेम या कंपनीने कोरोना व्हायरसचं गंभीर संक्रमण झालेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी एक नवीन मार्ग शोधून काढला आहे. यरूशलम पोस्ट ने दिलेल्या माहितीनुसार तीन रुग्णांलयांमध्ये सहा रुग्णांवर प्लेसेंटा थेरेपी करण्यात आली होती. त्यातील सहापैकी चार रुग्ण किडनी आणि हृदय विकाराच्या आजाराने प्रभावित होते. 

अमेरिकेतसुद्धा सकारात्मक परिणाम 

अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये असलेल्या एका मेडीकल सेंटरमधील रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. त्या रुग्णाची श्वास घेण्याची क्षमता कमी झाली होती. स्टेम सेल थेरेपीचा वापर यावेळी कोरोना रुग्णावर पहिल्यांदा करण्यात आला होता. 

कशाप्रकारे काम करते ही थेरेपी

उपचारांसाठी वापर केल्या जात असलेल्या सेल्सना पीएलएक्स असं नाव देण्यात आलं आहे. हे एलोजेनीक म्हणजेच अनुवाशिंकतेने भिन्न असलेले सेल्स आहेत. यात शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती सक्रिय करण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांचा समावेश असतो. हे सेल्स रोगप्रतिकारकशक्तीवर नैसर्गिकरित्या परिणाम करत असलेल्या टी सेल्स आणि एम-2 मेक्रोफेज्सना सक्रिय करतात. निमोनीया आणि फुप्फुसांमध्ये आलेली सूज कमी करण्यासाठी परिणामकारक ठरत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या श्वसन प्रणालीत सुधारणा होऊन जीव वाचवला जाऊ शकतो. असं तज्ञांचं मत आहे. 

(Israeli firm hopeful as it starts treating COVID-19 patients with placenta cells)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या