Covaxin: कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना दिलासा मिळणार?; आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 12:59 PM2021-11-03T12:59:29+5:302021-11-03T12:59:55+5:30

असे अनेक देश आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्यासाठी आणि प्रवाशांना त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे

Coronavirus: Bharat Biotech’s Covaxin likely to get WHO’s approval today for emergency use | Covaxin: कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना दिलासा मिळणार?; आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता

Covaxin: कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना दिलासा मिळणार?; आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता

googlenewsNext

नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला आज जागतिक आरोग्य संघटना(WHO) हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता आहे. WHO ची टेक्निकल कमिटी आज भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी असलेल्या लसीच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी बैठक घेणार आहे. यापूर्वी कमिटीने दोनदा कोव्हॅक्सिन उत्पादित करणाऱ्या कंपनीकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.

मागील आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनाचे तांत्रिक सल्लागार समितीने भारतातील स्वदेशी लस कोव्हॅक्सिन (Covaxin)ला आपत्कालीन वापरासाठी यादीत टाकण्यासाठी अतिरिक्त माहिती मागवली होती. या माहितीच्या आधारे आज ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आधीच्या बैठकीबाबत, WHO ने म्हटले होते की, लसीचा जागतिक वापर लक्षात घेता अंतिम लाभ-जोखीम मूल्यांकनासाठी निर्मात्याकडून अतिरिक्त स्पष्टीकरण मागवले जाणे आवश्यक आहे असं 'तांत्रिक सल्लागार गटाने बैठकीत निर्णय घेतला. दुसऱ्यांदा जेव्हा WHO ने भारत बायोटेककडून स्पष्टीकरण मागितले होते. ग्लोबल हेल्थ एजन्सीने आधीच स्पष्ट केले आहे की ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी तिचे पूर्ण मूल्यांकन करणे आवश्यक आहे.

भारत बायोटेकच्या लसीला अनेक देशांची मान्यता

WHO ने आतापर्यंत ६ लसींना मान्यता दिली आहे. यामध्ये फायझर, बायोएनटेक (Pfizer/BioNtech) कोमिरनेटी, एस्ट्राजेनेका कोविशील्ड (AstraZeneca's Covishield) जॉन्सन अँन्ड जॉन्सन (Johnson & Johnson's Vaccine), मॉडर्ना (Moderna) सिनोफार्म( Sinopharm)या लसींचा समावेश आहे.  तथापि, असे अनेक देश आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्यासाठी आणि प्रवाशांना त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. या देशांमध्ये गयाना, इराण, मॉरिशस, मेक्सिको, नेपाळ, पॅराग्वे, फिलीपिन्स, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, ओमान, श्रीलंका, एस्टोनिया आणि ग्रीस यांचा समावेश आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची कोविशील्ड या भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या दोन लसी आहेत. ऑस्ट्रेलियाने आधीच कोविशील्डला मान्यता दिली आहे.

 भारत बायोटेकने एप्रिलमध्येचपाठवला प्रस्ताव

लस विकसित करणार्‍या हैदराबादस्थित भारत बायोटेकने(Bharat Biotech) १९ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेला त्‍याच्‍या लसीच्‍या आपत्‍कालीन वापराच्‍या सूचीसाठी ईओआय सादर केले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी सांगितले की, कोविड-१९ लसींच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी प्रक्रिया जलद करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) बळकट केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह G-20 नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. COVID-19 लसीकरण जगासाठी फायदेशीर आहे असं सगळ्यांनी मान्य केलंय. पंतप्रधान मोदींनी शनिवारी G20 नेत्यांना सांगितले की, जगाला साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी भारत पुढील वर्षाच्या अखेरीस अँटी-कोविड-19 लसीचे पाच अब्जाहून अधिक डोस तयार करण्यास तयार आहे.

Web Title: Coronavirus: Bharat Biotech’s Covaxin likely to get WHO’s approval today for emergency use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.