शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आता कोरोनावरील उपचारासाठी ‘अँटीबॉडी कॉकटेल’ भारतातही उपलब्ध, एका डोसची किंमत 59,750 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 15:28 IST

हलक्या स्वरुपाची आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी 'रामबाण'

नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यातच जगातील अग्रगण्य औषध निर्माता कंपनी Roche ने तयार केलेली 'अँटीबॉडी कॉकटेल' आता भारतातही उपलब्ध होईल. Roche एक स्विस कंपनी असून ती भारतात प्रसिद्ध फार्मा कंपनी सिप्लाच्या माध्यमाने हे औषध लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. (CoronaVirus Antibody cocktail used to treat covid 19 is now available in india)

हलक्या स्वरुपाची आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी 'रामबाण' -या औषधात Casirivimab आणि Imdevimab नावाच्या दोन औषधांचे मिश्रण आहे. ही दोन्ही अँटीबॉडी औषधं व्हायरसवरील उपचारावर चांगल्या प्रकारे प्रभावी आहेत. विशेषतः हलक्या आणि मध्यम स्वरुपाचे संक्रमण असलेल्या रुग्णांसाठी हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. Central Drugs Standards Control Organisation (CDSCO) ने देशातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या औषधाच्या वापराला मंजुरी दिली. तेव्हापासूनच हे औषध भारतीय नागरिकांसाठी लवकरच उपलब्ध होईल, असे कयास लावले जात होते. यूरोप आणि अमेरिकेत या औषधाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे.

12 वर्षांवरील मुलांनाही दिले जाऊ शकते हे अँटीबॉडी कॉकटेल -या औषधाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, हे औषध म्हणजे, सर्वसामान्यपणे लॅबमध्ये तयार करण्यात आलेले प्रोटीन आहेत. हे प्रोटीन व्हायरसचा सामना करण्यासाठी इम्यून सिस्टमच्या क्षमतेची कॉपी करतात. यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. महत्वाचे म्हणजे, या औषधाचा वापर 12 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांवरही केला जाऊ शकतो.

या औषधाची किंमत सध्या फार अधिक असेल. प्रत्येक रुग्णासाठी या औषधाच्या डोसची किंमत 59,750 रुपए एवढी असेल. यात सर्व प्रकारच्या करांचा समावेश आहे. हे औषध मुख्य रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्रांच्या माध्यमाने उपलब्ध होईल. सर्वसामान्यांचा विचार करता ही किंमत फार अधिक आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल