शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

आनंदाची बातमी! कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी, कमी वेळात रुग्ण बरे होणार, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 17:20 IST

CoronaVirus News & Latest Updates : दरम्यान कोरोनाच्या पहिल्या औषधाला मंजुरी मिळाली आहे. उपचारांसाठी रेमडेसिवीर हे औषध कोरोना रुग्णांना दिलं जाणार आहे. 

कोरोना व्हायरसने  संपूर्ण जगभरातील देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसची लस कधी उपलब्ध होणार यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर करून कोरोना रुग्णांचा जीव वाचवला जात होता. आता कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांच्या सध्या वेगवेगळ्या औषधांवर चाचणी सुरू आहे.  दरम्यान कोरोनाच्या पहिल्या औषधाला मंजुरी मिळाली आहे. उपचारांसाठी रेमडेसिवीर हे औषध कोरोना रुग्णांना दिलं जाणार आहे. 

कॅलिफोर्नियातील गिलियड सायन्सेज  कंपनीने या औषधाची निर्मीती केली आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांवर  आपातकालीन स्थितीत उपचार करण्यासाठी या औषधाला मान्यता देण्यात आली होती. आता अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औषधाला उपचारासाठी मंजुरी दिली आहे. अमेरिकेतील प्रमुख आयोग्यसंस्था FDA ने मान्यता दिलेलं हे पहिलंच औषध आहे. 

कोरोनाच्या उपचारांत रेमडेसिविर कितपत प्रभावी, WHO च्या तज्ज्ञांनी सांगितलं

अमेरिकन औषधनिर्माता कंपनी गिलिएड सायन्सच्या रेमडेसिवीर औषधाचा वापर भारतात केला जात होता.  तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचार करण्यासाठी याच औषधाचा वापर केला गेला होता.  हे एंटी व्हायरल ड्रग असून  जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेरिविरच्या उपयुक्ततेबाबत सांगितले होते की, सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये रेमडेसिवीर कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात फारसे परिणामकारक दिसून आले नाही. या औषधामुळे रुग्णाच्या संसर्गाचे दिवसही कमी झाल्याचे दिसले नाही. दरम्यान, गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यात हे औषध परिणामकारक ठरले नाही. दिलासादायक! भारतात १०० स्वयंसेवकांवर होणार स्पुटनिक-व्ही लसीची चाचणी, सरकारनं दिली परवानगी

या संशोधनादरम्यान, ३० देशांमधील ११ हजारांहून अधिक वयस्कर रुग्णांवर या औषधांच्या दिसून आलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यामध्ये ही औषधे बाधित रुग्णांवरील उपचारात कुठलेही सकारात्मक परिणाम देत नसल्याचे, तसेच मृत्युदरामध्येही फारसा फरक पाडत नसल्याचे समोर आले होते.जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले होते की, या संशोधनामध्ये औषधांचा कुठलाही परिणाम दिसून न आल्यानंतर हायड्रोक्सिक्लोरोक्विन, अँटी एचआयव्ही ड्रग कॉम्बिनेशन लोपिनाविर-रिटोनाविर यांच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले होते. या संशोधनाबाबतची माहिती लवकरच कुठल्यातरी मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे, त्यानंतर या संधोधनाला अधिकृतरीत्या मान्यता मिळेल. चिंताजनक! पुढची २० वर्ष कोरोना लसीची गरज भासणार, आदर पुनावालांनी सांगितले कारण...

टॅग्स :AmericaअमेरिकाHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicinesऔषधं