शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

CoronaVirus : कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यासाठी 'हा' फॅक्टर असू शकतो कारणीभूत, वाचा रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 12:00 IST

उन्हाळ्यात व्हायरस संक्रमण कमी होईल असं अनेकांना वाटत होतं. पण काही कारणांमुळे संक्रमण वेगाने पसरू शकतं.

उन्हाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र गरमीचं वातावरण पसरलं आहे. अशात घराघरात एसी लावण्याची सुरूवात झाली आहे. शास्त्रांच्यामते एसीमुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो.  चीनमध्ये सुद्धा अशा घटना समोर आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला एसी लावल्यामुळे कोरोना व्हायरस कसा पसरला याबाबत तपशिलात सांगणार आहोत.

रेस्टॉरंटपासून झाली सुरूवात

एसीमुळे संक्रमण होण्याची सुरूवात चीनच्या Guangzho शहरातून झाली.  २३ जानेवारीला एक व्यक्ती वुहानवरून आलेल्या कुटुंबातील एका सदस्यासोबत रेस्टॉरंटमध्ये गेला होता. जेवत असताना त्यांच्या टेबलच्या बाजूला एक दुसरं कुटुंब सुद्धा बसलं होतं. त्याच रात्री वुहानवरून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणं दिसायला सुरूवात झाली.  काही दिवसांनंतर या व्यक्तीच्या टेबल शेजारी बसलेल्या नऊ लोकांची टेस्टसुद्धा पॉजिटिव्ह आली. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत कोरोनाचं संक्रमण आणि इतर स्त्रोतांना ट्रॅक केलं गेलं. त्याप्रमाणेच अमेरिकेतील एका रिसर्चनुसार कोरोनाचे संक्रमण एसी मुळे झाल्याचं दिसून आलं.

एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या खोकण्या किंवा शिंकण्यातून व्हायरसचा प्रसार झपट्याने होत जातो. शिंकण्यातून आलेले ड्रॉपलेट्स एअर फ्लोमध्ये पसरल्यामुळे संक्रमण पसरतं. रिसर्चकर्त्यांच्यामते एसीचं डिजाईन कोरोना व्हायरस पसरण्यापासून थांबवेल असं केलेलं नाही. एसीतून हवेच्या प्रवाहात व्हायरससुद्धा सर्क्यलेट होत असतो.  त्यामुळे संक्रमण दुपटीने वाढण्याचा धोका असतो.  कोरोना व्हायरस प्लास्टिक  किंवा एखाद्या धातूवर जवळपास १५ तास टिकून राहतो.

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे कोरोनाचं होणारं संक्रमण रोखता येऊ शकतं. युनिव्हरसिटी ऑफ ऑरेगन आणि युनिव्हरसिटी ऑफ कॅलिफोर्निया यांनी मिळून सार्सच्या महामारीचा अभ्यास केला असता असं दिसू आलं की सार्वजनीक  ठिकाणं, ऑफिसेस अशा एसीचा सर्वाधिक वापर असलेल्या ठिकाणी जिथे व्हेटिलेशन व्यवस्थित होत नाही. त्या भागात संक्रमण जास्त पसरलं होतं. (हे पण वाचा-कोरोना व्हायरसमुळे होऊ शकता ताण-तणावाचे शिकार, 'हे' उपाय वापराल तर टेंशन फ्री रहाल)

प्रकाशात कोणत्याही बॅक्टेरिया आणि व्हायरसची ग्रोथ कमी होते. असं मानलं जातं की UV डेलाइट पॅथोजन पसरण्यासाठी अनुकूल नाही. त्यासाठी प्रकाश येण्यासाठी कोणत्याही घरातील पडदे, खिडक्या खुल्या ठेवायला हव्यात. त्यामुळे व्हायरस जीवंत राहू शकत नाही. असं मत रिसर्चकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. ( हे पण वाचा-तुमच्या 'या' सवयींकडे दुर्लक्ष केल्याने अडकू शकता कोरोनाच्या जाळ्यात, वेळीच व्हा सावध)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य