Corona: जीवघेण्या कोरोना व्हायरसचं नाव कोरोना का पडलं असेल? जाणून घ्या कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 10:15 AM2020-01-31T10:15:15+5:302020-01-31T10:20:05+5:30

कोरोना व्हायरसमुळे जगभरात चिंता वाढली आहे. सगळीकडे फक्त कोरोना व्हायरस हाच विषय दिसून येत आहे.

Corona: Why would the deadly corona virus be named Corona? | Corona: जीवघेण्या कोरोना व्हायरसचं नाव कोरोना का पडलं असेल? जाणून घ्या कारण... 

Corona: जीवघेण्या कोरोना व्हायरसचं नाव कोरोना का पडलं असेल? जाणून घ्या कारण... 

Next

कोरोना व्हायरसमुळे जगभरात चिंता वाढली आहे. सगळीकडे फक्त कोरोना व्हायरस हाच विषय दिसून येत आहे. चीनच्या हुआन शहरातून हा व्हायरस जगभरात आपलं जाळं वाढवत आहे. हा व्हायरस इतरा घातक आहे की, आतापर्यंत जगभरात या व्हायरसने जवळपास २०० लोकांचा बळी गेलाय. भारतातील केरळमध्येही याचा एक रूग्ण आढळून आलाय. या व्हायरसबाबत वेगवेगळी चर्चा केली जात आहे. त्यातीलच एक म्हणजे या व्हायरसचं नाव कोरोना कसं पडलं? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

कुठून आला कोरोना व्हायरस?

कोरोना व्हायरस हा काही खासप्रकारच्या प्रजातींमध्ये आढळणारा व्हायरस आहे. यात साप, वटवाघुळ यांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. जेव्हा हा व्हायरस मानवी शरीरात पोहोचला तेव्हा त्याने स्वत:ला असं विकसित केलं की, तो मनुष्यांमध्येही जिवंत राहील. त्याचं हे बदललेलं रूपच वैज्ञानिकांसाठी आव्हान ठरत आहे.

मनुष्यांमध्ये कसा पोहोचला?

(Image Credit : express.co.uk)

अनेकांना हा प्रश्न पडतोय की, प्राण्यांमधील हा व्हायरस मनुष्यांमध्ये कसा आला? तर चीनमध्ये साप आणि वटवाघुळं खाल्ली जातात. त्यांच्या माध्यमातूनच मानवी शरीरात हा व्हायरस शिरला. मेडिकल एक्सपर्ट सांगतात की, कोरोना व्हायरस इतक्या वेगाने पसरण्याचं कारण याचं संक्रमण असू शकतं. असे मानले जात आहे की, कोरोना व्हायरस हवा, ओलावा आणि श्वासांच्या माध्यमातून मनुष्यांमध्ये पसरतो आहे. तसेच आणखी एक कारण म्हणजे लोक अर्धवट शिजलेलं मांस किंवा कच्च मांस खात आहेत. सी फूडच्या माध्यमातूनही हा व्हायरस पसरत आहे.

कोणत्या फॅमिलीतील आहे कोरोना व्हायरस?

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, कोरोना व्हायरस हा SARS आणि MERS व्हायरस फॅमिलीतील आहे. अशीही शक्यता वर्तवली जात आहे की, हा व्हायरस जर गाय, म्हैस आणि डुकरांमध्ये पसरला तर डायरियाची समस्याही वाढू शकते. त्यामुळेच एक्सपर्ट सी-फूड, मांस न खाण्याचा सल्लाही देत आहेत. 

कोरोना हे नाव कसं पडलं?

(Image Credit : health.howstuffworks.com)

अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, या व्हायरसचं नाव कोरोना कसं पडलं? तर जेव्हा सूर्य ग्रहण लागतं म्हणजे जेव्हा सूर्य ग्रहणावेळी पृथ्वी सूर्याला पूर्णपणे झाकत असते तेव्हा सूर्य दिसणं बंद होतं. पण त्याच्या सूर्यकिरणांनी चारही बाजूने पसरलेला प्रकाश दिसत असतो. नंतर हा प्रकाश गायब होताना दिसतो. आणखी एक उदाहरण द्यायचं तर सूर्य ग्रहणावेळची ही स्थिती सूर्य फुलासारखी होते. म्हणजे सूर्य फूल हे मधे काळं असतं आणि बाकी वरचा गोलाकार भाग हा पिवळ्या पाकळ्यांना वेढलेला असतो म्हणजे याला सूर्यकिरण म्हणता येईल. पृथ्वीच्या चारही बाजूने पसरत असलेल्या सूर्याच्या या प्रकाशाला कोरोना असं म्हटलं जातं. त्यामुळेच या व्हायरसला कोरोना असं नाव देण्यात आलं आहे. कारण याची बनावट तशीच आहे. हा व्हायरस गोल असून त्यावर पृथ्वीच्या कोरोनासारख्याच प्रोटीनच्या स्टेन्स उगवल्या आहेत. या सगळीकडे आहेत.


Web Title: Corona: Why would the deadly corona virus be named Corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.