चिंता वाढली! कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यांत राहणार शिगेला; वैज्ञानिकांनी दिला मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:48 PM2021-08-30T20:48:21+5:302021-08-30T20:51:59+5:30

आयआयटी-कानपूरचे वैज्ञानिक मनींद्र अग्रवाल म्हणाले, एखादा नवा व्हेरिएंट आला नाही, तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. मणिंद्र हे तीन सदस्यीय तज्ज्ञांच्या टीमचा एक भाग आहेत.

Corona Virus The third wave may peak in october november the intensity is likely to be a quarter | चिंता वाढली! कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यांत राहणार शिगेला; वैज्ञानिकांनी दिला मोठा इशारा

चिंता वाढली! कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यांत राहणार शिगेला; वैज्ञानिकांनी दिला मोठा इशारा

Next

नवी दिल्ली - कोरोनाची भीती अजूनही संपलेली नाही. यासंदर्भात वैज्ञानिकांनी पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. वैज्ञानिकांच्या मते, ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान भारतात कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचू शकते. मात्र, तीची तीव्रता दुसऱ्या लाटेच्या तुलनेत बरीच कमी असेल. महामारीचे गणितीय मॉडेल तयार करण्याऱ्या वैज्ञानिकांपैकी एका वैज्ञानिकाने सोमवारी यासंदर्भात भाष्य केले आहे. (Corona Virus The third wave may peak in october november the intensity is likely to be a quarter)

आयआयटी-कानपूरचे वैज्ञानिक मनींद्र अग्रवाल म्हणाले, एखादा नवा व्हेरिएंट आला नाही, तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. मणिंद्र हे तीन सदस्यीय तज्ज्ञांच्या टीमचा एक भाग आहेत. या टीमकडे महामारीच्या वाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे. जर तिसरी लाट आलीच, तर देशात रोज एक लाख नव्या कोरोना बाधितांची नोंद होईल. दुसऱ्या लाटेचा विचार करता, दुसरी लाट मे महिन्यात शिगेला असताना रोज चार लाख रुग्णांचा नोंद होत होती. दुसऱ्या लाटेत हजारो लोकांचा मृत्यू झाला. तर लोखो लोक संक्रमित झाले होते.

CoronaVirus Updates: चिंता वाढली...! 24 तासांत जगात सर्वाधिक नवे कोरोना बाधित भारतात; अशी आहे स्थिती

अग्रवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे, की "नवीन म्युटेशन झाले नाही, तर अशीच स्थिती कायम राहील. जर सप्टेंबरपर्यंत 50% अधिक संसर्गजन्य म्युटेशन समोर आला, तर नवा व्हेरिएंट समोर येईल. तिसरी लाट नव्या व्हेरिएंटनेच येईल. त्या स्थितीत नव्या रुग्णांची संख्या वाढून रोज एक लाख रुग्णांची नोंद होईल.

गेल्या महिन्यात, मॉडेलच्या आधारे अंदाज वर्तवण्यात आला होता, की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरदरम्यान तिसरी लाट शिगेला पोहोचेल. रोज 1.5 ते दोन लाखांपर्यंत रुग्णांची नोंद होईल. मात्र, SARS-CoV-2 चे अधिक संसर्गजन्य म्युटेशन झाले, तरच अशी स्थिती निर्माण होईल. मात्र सध्या, डेल्टापेक्षा अधिक संसर्गजन्य व्हेरिएंट समोर आलेला नाही.

एकच नंबर! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी मोठी खूषखबर; तिसऱ्या लाटेआधी चिंताच मिटली

Web Title: Corona Virus The third wave may peak in october november the intensity is likely to be a quarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.