शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Symptom : फक्त स्किनवरच दिसतं ओमिक्रॉनचं 'हे' विचित्र लक्षण, दिसताक्षणी व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 22:10 IST

डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिअंट सौम्य असला तरी, त्याचा संसर्ग दर खूप अधिक आहे आणि त्याला कुणीही अगदी सहजपणे बळी पडू शकतो. एवढेच नाही तर याची लक्षणेही डेल्टाच्या तुलनेत वेगळी आहेत.

कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे झपाट्याने वाढणारी रुग्ण संख्या धडकी भरवणारी आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लादले जात आहेत. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिअंट सौम्य असला तरी, त्याचा संसर्ग दर खूप अधिक आहे आणि त्याला कुणीही अगदी सहजपणे बळी पडू शकतो. एवढेच नाही तर याची लक्षणेही डेल्टाच्या तुलनेत वेगळी आहेत. यापार्श्वभूमीवर, आरोग्य तज्ज्ञ याच्या लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा सल्ला देत आहेत, जेणेकरून त्याचा संसर्ग वेळीच वाढण्यापासून रोखता येईल.

Omicron चे असामान्य लक्षण - आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लोकांना आतापर्यंत Omicronची अनेक लक्षणे माहीत झाली आहेत, परंतु एक लक्षण असे आहे, की ज्याकडे लोकांचे लक्ष सहज सहजी जात नाही. तज्ज्ञांनी लोकांना त्यांच्या त्वचेवरही लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कारण या नव्या व्हेरिअंटमुळे स्किनवर रॅशेस येऊ शकतात. ZOE Kovid Symptom Study App नुसार, Omicron ची लागण झालेल्या बहुतेक लोकांनी त्वचेवर रॅशेसच्या तक्रारी केल्या आहेत. हे एक मुख्य लक्षण असून त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दोन प्रकारचे रॅशेस - तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉन संसर्गात त्वचेवर दोन वेगवेगळ्या प्रकारचे रॅशेस दिसून येतात. स्किन रॅशेसचा (Rashes) पहिला प्रकार, अचानक पणे दिसू लागतो आणि खाजही येते. हा प्रकार लहान-लहान पुरळांसारखा असू शकतात आणि याला तीव्र खाज सुटते. ही खास साधारणपणे हातांपासून अथवा तळ हातांपासून सुरू होते. दुसऱ्या प्रकारच्या रॅशेसमध्ये, ते घामोळ्यांसारखे दिसतात आणि संपूर्ण शरीरावर पसरतात. तसेच, ते साधारणपणे कोपरा, गुडघा, हात आणि पायांवर अधिक दिसून येतात.

डॉक्टरांचा इशारा - लंडनमधील एका डॉक्टरने यापूर्वीच इशारा देत म्हटले होते, की  ओमायक्रॉनची लागण झालेल्या मुलांमध्ये रॅशेसची समस्या दिसून आली आहे. मात्र, प्रौढांमध्ये हे लक्षण कमी प्रमाणात दिसून आले आहे. डॉ डेव्हिड लॉयड यांनी द सनशी बोलताना सांगितले होते, की त्यांना ओमायक्रॉनची लागन झालेल्या सुमारे 15 टक्के तरुण रुग्णांमध्येही रॅशेस दिसून आली आहेत. याशिवाय थकवा, डोकेदुखी आणि भूक न लागणे यासारख्या समस्याही त्यांच्यात आढळून आल्या. पुरळ उठण्यासोबतच ही लक्षणे ओळखणेही अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस