शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

Corona Virus : चिंताजनक! 'या' लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, 'हे' आजार असल्यास ठरेल जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:20 IST

Corona Virus : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोणी अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे ते जाणून घेऊया...

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मृतांचा आकडाही भयावह आहे. सरकारांकडून आवश्यक पावलं उचलली जात आहेत. लोकांना आवश्यक खबरदारी घेण्यास सांगितलं जात आहे. सर्व वयोगटातील लोकांना कोरोना व्हायरसचा धोका आहे, परंतु काही प्रकरणांमध्ये कोरोना अधिक धोकादायक असू शकतो. अशा लोकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोणाला अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे ते जाणून घेऊया...

कोरोना व्हायरसची लक्षणं

खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होणं ही कोरोनाची सामान्य लक्षणं आहेत. याचा फुफ्फुसांवर परिणाम होतो. छातीत जडपणा येऊ शकतो. कोरोनाच्या व्हेरिएंटनुसार, त्याची लक्षणं देखील बदलू शकतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये लोकांना कोणत्याही प्रकारची चव समजत नाही आणि त्यांना कोणताही वास येत नाही. यातून बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो. एक सामान्य संक्रमित व्यक्ती दोन आठवड्यात किंवा त्याआधी बरी होते. अनेक प्रकरणांमध्ये त्याचा दीर्घकालीन परिणाम देखील दिसून येतो.

 कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ

कोणाला जास्त धोका?

श्वसनाचा त्रास असलेले रुग्ण

जर तुम्हाला आधीच दमा, फुफ्फुसात फायब्रोसिस इत्यादी श्वसनाच्या आजारांनी ग्रासले असेल, तर विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना श्वसनसंस्थेवर देखील परिणाम करतो. अशा परिस्थितीत संसर्ग होणं अधिक धोकादायक ठरू शकतं.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब

मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दोन्ही आजार सामान्य आहेत. परंतु या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी कोरोनाचा संसर्ग धोकादायक ठरू शकतो.

एकापेक्षा जास्त आजार

जेव्हा एखादी व्यक्ती एकाच वेळी एकापेक्षा जास्त आजारांनी ग्रस्त असते तेव्हा गंभीर परिस्थिती उद्भवते. अशा परिस्थितीत, कोरोना संसर्ग प्राणघातक ठरू शकतो. यापूर्वी कोरोना लाटेदरम्यान अशा रुग्णांमध्ये धोका जास्त दिसून आला होता.

 "कोरोनासोबत जगण्याची सवय लावा, २१-२८ दिवस...”; नव्या व्हेरिएंटबद्दल काय म्हणाले तज्ज्ञ?

मुलं आणि गर्भवती महिला

आरोग्य तज्ज्ञ लहान मुलं आणि गर्भवती महिलांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देतात.

गंभीर आजाराचे रुग्ण

कॅन्सर, किडनी डायलिसिस, ट्रान्सप्लांट इत्यादी गंभीर आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यावी. कमकुवत रोग प्रतिकारशक्तीमुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

अशी घ्या काळजी

- गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, अशा ठिकाणी संसर्गाचा धोका जास्त असू शकतो.

- जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर मास्क नक्कीच लावा.

- नियमितपणे हात धुण्याची सवय लावा, स्वच्छता ठेवा. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स