शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

Corona Virus : WHO च्या इशाऱ्यानं टेन्शन वाढवलं! कोरोना लसींच्या बूस्टर डोसवर धक्कादायक भाष्य केलं; दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 17:26 IST

"सध्याच्या लसी गंभीर आजार आणि व्हेरिअंट ऑफ कंसर्नमुळे (Variants of Concern) होणाऱ्या मृत्यूंविरोधात चांगली सुरक्षितता प्रदान करत आहेत. पण..."

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक देशांत लसीकरण आणि बूस्टर डोसच्या मोहीमाही राबवल्या जात आहेत. यातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) टेन्शन वाढवणारा इशारा दिला आहे. सध्याच्या लसींचा बूस्टर डोस पुरेसा नाही आणि संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी लस विकसित करणे गरजेचे आहे, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांनी मंगळवारी इशारा दिला आहे, की सध्याच्या लसींचा बूस्टर डोस (Booster Dose) हा नव्या व्हेरिअंट विरोधात प्रभावी रणनिती नाही.

प्रभावी लस तयार करणे आवश्यक -जागतिक आरोग्य संखटनेच्या (WHO) टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुपच्या (WHO Technical Advisory Group) तज्ज्ञांच्या एक समूहाने कोरोना लसीच्या कंपोझिशन (TAG-Co-VAC)संदर्भात म्हटले आहे, की सध्याच्या लसी गंभीर आजार आणि व्हेरिअंट ऑफ कंसर्नमुळे (Variants of Concern) होणाऱ्या मृत्यूंविरोधात चांगली सुरक्षितता प्रदान करत आहेत. मात्र, आपल्याला भविष्यात अशा लसी तयार कराव्या लागतील, ज्या प्रभावीपणे संसर्ग रोखू शकतील. 

नव्या लसींच्या माध्यमानेच गंभीर आजार आणि मृत्यू चांगल्या प्रकारे रोखले जाऊ शकतील. एवढेच नाही, तर पुढील सहा ते आठ आठवड्यांत युरोपातील जवळपास 50 टक्के लोक कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटने संक्रमित झालेले असतील, असेही WHO ने म्हटले आहे.

सध्याच्या लसींचे बूस्टर डोस अपुरे - कोरोना व्हॅक्सीन संदर्भातील WHO च्या टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुपने  (TAG-Co-VAC) एका निवेदनात म्हटले आहे की, मूळ व्हॅक्सीन फॉर्म्युलेशनच्या बूस्टर डोसवर आधारित लसीकरण धोरण योग्य अथवा टिकाऊ असण्याची शक्यता नाही. सुरुवातीच्या डेटावरून सूचित होते, की जे लोक नव्या Omicron व्हेरिअंटने संक्रमित झाले आहेत, त्यांचा कोरोनापासून बचाव करण्यात विद्यमान लसी कमी प्रभावी होत्या. यामुळे, अशा लसी विकसित करणे आवश्यक आहे, ज्या केवळ गंभीर आजारी पडण्यापासूनच संरक्षण करणार नाहीत, तर संक्रमण आणि प्रसारही अधिक चांगल्या प्रकारे रोखू शकतील.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना