सामान्यांना कोरोनाची लस कधी आणि कशी मिळणार? केंद्राने दिल्या लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्स

By manali.bagul | Published: December 15, 2020 11:55 AM2020-12-15T11:55:27+5:302020-12-15T12:31:21+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोविड व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क (को-डब्ल्यूआयएन) सिस्टिम विकसित केली गेली आहे. या डिजिटल व्यासपीठावर स्टॉकच्या आणि लसीच्या वितरणाविषयी रीअल-टाइम अपडेट्स मिळतील.

Corona vaccine guidelines by central govt sop for mass vaccination drive all you need to know | सामान्यांना कोरोनाची लस कधी आणि कशी मिळणार? केंद्राने दिल्या लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्स

सामान्यांना कोरोनाची लस कधी आणि कशी मिळणार? केंद्राने दिल्या लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्स

Next

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाचे अभियान संपूर्ण जगभरात सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतातही केंद्र सरकारने सोमवारी विविध राज्यांना कोरोनाशी  संबंधीत  गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात सरकारकडून ३० कोटी लोकांचे लसीकरण करण्यासाठी तयार केली जात आहे.

त्यात हेल्थकेअर, फ्रंटलाईन कामगार आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांचा तसंच ५० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लोकांचा समावेश आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्नुसार लस देण्यासाठी ३० मिनिटांपर्यंत लोकांना निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या लसीकरणासाठी कसा प्लॅन तयार केला आहे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लसी देण्यात येणार आहे. यामध्ये एक कोटी आरोग्य कर्मचारी, २ कोटी फ्रंटलाईन वर्करर्स, ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील  लोक आणि गंभीर आजारांनी पीडित असलेले ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या १ कोटी लोकांचा समावेश असेल. हेल्थकेअर आणि फ्रंटलाईन कामगारांना रुग्णालय किंवा दवाखान्यांसारख्या ठिकाणी लस दिली जाणार आहे. इतर वेगवेगळ्या ग्रुप्ससाठी वेगळी व्यवस्था केली जाऊ शकते.  लसीकरण व्यवस्थापनाने मोबाईल साईट्स ऑपरेटींगची सुद्धा तयारी केलेली आहे. 

कोरोनाची लस सगळ्यात आधी कोणाला द्यायला हवी. यासाठी  सरकारकडून मतदार यादीचा आधार घेतला जाणार आहे.  जेणेकरून ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ओळखता येऊ शकता. गंभीर आजार असलेल्या लोकांची माहिती नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे किंवा आरोग्य मंत्रालयाकडून मिळवली जाणार आहे.

लसीकरणासाठी पोलिंग बूथ, कॉलेजेस, कम्यूनिटी हॉल्सचा वापर केला जाणार आहे. या व्यतिरिक्त पालिका भवन, पंचायत इमारती, रेल्वे रुग्णलय, पॅरामिलिट्री फोर्सेसचे कँम्प या ठिकाणांचा लसीकरणासाठी वापर केला जाणार आहे. 

co-win-

कोविड व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क (को-डब्ल्यूआयएन) सिस्टिम विकसित केली गेली आहे. या डिजिटल व्यासपीठावर स्टॉकच्या आणि लसीच्या वितरणाविषयी रीअल-टाइम अपडेट्स मिळतील. लसीसाठी कोणाची नोंदणी केली गेली आहे आणि त्यांचे लसीकरण केव्हा होईल याचे अपडे्ट या सिस्टिमध्ये मिळतील.

सॅनिटरी नॅपकिन बदलण्याआधी, नंतर 'असा' निष्काळजीपणा करत असाल; तर वेळीच सावध व्हा

जेथे कोविड लस दिली जाईल तेथे तीन खोल्या असणे आवश्यक आहे. येथे प्रतीक्षालय, लसीकरण कक्ष आणि तिसरे निरीक्षण कक्ष असेल. तिन्ही ठिकाणी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणं गरजेचं असेल. जेव्हा लसीकरण कक्षात एखाद्या स्त्रीला लस दिली जाईल तेव्हा महिला कर्मचारी सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असेल.

कोरोनाची लस दिल्यानंतर दिसू शकतात हे ५ साईड इफेक्टस; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

ही देशातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. वेगवेगळ्या लसींचे मिश्रण होऊ नये म्हणून केवळ एकाच कंपनीच्या उत्पादकांना लस पुरवण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे. लस वाहक,आईसपॅक थेट सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी सर्व व्यवस्था केली जाईल.  लस येईपर्यंत पातळ लस वाहकात (वॅक्‍सीन कॅरियर) ठेवली जाईल.

Web Title: Corona vaccine guidelines by central govt sop for mass vaccination drive all you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.