शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

ओमायक्रॉनच्या 'स्टील्थ व्हेरिएंट' चा जगात धुमाकूळ; भारतातही परिणाम होणार का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 13:23 IST

Stealth Omicron : सध्या कोरोनाचा उगम झालेल्या चीनमध्ये हा स्टील्थ व्हेरिएंट सर्वाधिक पसरत आहे. अशा स्थितीत हा स्टील्थ व्हेरिएंट भारतालाही अडचणीत आणणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नवी दिल्ली : तीन वर्षांनंतरही जग कोरोनामुळे (corona) भयभीत आहे. कोरोनाची प्रकरणे कमी होताच पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा कोरोनाने कहर दाखवायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट (New variant of Omicron), ज्याला स्टील्थ किंवा BA.2 व्हेरिएंट (BA.2 variant) देखील म्हटले जात आहे, हा सध्या जगभरात वेगाने पसरत आहे.

सध्या कोरोनाचा उगम झालेल्या चीनमध्ये हा स्टील्थ व्हेरिएंट सर्वाधिक पसरत आहे. अशा स्थितीत हा स्टील्थ व्हेरिएंट भारतालाही अडचणीत आणणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या भारतात कोरोनाची बरीच नवीन प्रकरणे समोर आली आहेत, परंतु हे वादळापूर्वीच्या शांततेसारखे आहे, असे काही लोकांना वाटत आहे.

BA.2 हा ओमायक्रॉनचा पाचवा व्हेरिएंट आहे, जो गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळला होता. दरम्यान,  BA.2 व्हेरिएंट केवळ चीनमध्येच थांबणार नाही, तर इतर देशांमध्येही त्याचा प्रसार होईल, असे  जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) म्हणणे आहे. तर स्टील्थ व्हेरिएंटमुळे भारतात फारसा त्रास होणार नाही, असा दावा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे.

कोव्हिड-19 टास्क ग्रुपचे (Covid-19 task group) प्रमुख डॉ. नरेंद्र कुमार अरोरा (Dr Narendra Kumar Arora) यांनी इंडिया टुडेला सांगितले की, भारतात BA.2 व्हेरिएंटचा प्रसार होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यांनी सांगितले की, भारतात तिसऱ्या लाटेदरम्यान, कोरोनामुळे BA.2 बाधित लोकांची संख्या 75 टक्क्यांहून अधिक होती. यामुळेच आयआयटी कानपूरच्या अभ्यासात 22 जूनपर्यंत चौथी लाट येण्याची भीती वर्तविली होती. ती योग्य नाही आहे.

'झाडाच्या फांद्यांसारखाच नवीन व्हेरिएंट'आयएमए-कोचीच्या संशोधन कक्षाचे (Research Cell of the IMA-Kochi) प्रमुख डॉ. राजीव जयदेवन  Dr Rajeev Jayadevan) यांनी सांगितले की, हा व्हेरिएंट अगदी झाडाच्या फांद्यांसारखाच आहे. ज्याप्रमाणे झाडाच्या नवीन फांद्या बाहेर पडत राहतात, त्याचप्रमाणे कोरोनाचेही नवीन रूप येत राहतील. ते म्हणाले की, हा व्हेरिएंट चीनमध्ये अधिक पसरत आहे कारण वृद्धांमध्ये कमी लसीकरण झाले आहे. चुकीच्या माहितीमुळे चीनमधील वृद्धांनी लसीकरण केलेले नाही.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य