शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा, दिवसा आणि रात्रीनुसार बदलतो कोरोना रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 13:35 IST

बाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, कोरोना विषाणू चाचणीचे निकाल दिवस आणि रात्रीनुसार बदलू शकतात.

जवळपास दोन वर्षांपासून जगभरातील लोक कोरोना व्हायरसच्या कहरामुळे त्रस्त आहेत. या विषाणूबाबत जगभरातील शास्त्रज्ञ विविध संशोधन करत असले तरी अद्याप कोणालाच याबाबत अचूक माहिती मिळालेली नाही. कोरोनाबाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, कोरोना विषाणू चाचणीचे निकाल दिवस आणि रात्रीनुसार बदलू शकतात.

कोरोनाची लागण कधी झाली यावर परिणाम अवलंबूनएका अमेरिकन अभ्यासाच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या वँडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरने आपल्या अभ्यासानंतर दावा केला आहे की, व्हायरसचं काम वेळ आणि मानवी शरीराच्या घड्याळानुसार बदलतं. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुम्ही सकाळी कोरोना चाचणी केली तर त्याचे परिणाम रात्री केलेल्या निकालांपेक्षा वेगळे असू शकतात. यासोबतच तुमच्या झोपे-जागण्याच्या चक्राचाही कोरोना चाचणीवर परिणाम होतो.

दुपारच्या वेळेस मिळतो योग्य अहवालकोरोनावरील अमेरिकन अभ्यासात असाही दावा केला जात आहे की, कोरोना चाचणीचे निकाल दुपारी अचूक येण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीचा नमुना सकाळी किंवा रात्री न घेता दुपारी घेतल्यास चाचणीचा अचूक निकाल येण्याची दुप्पट शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. दुपारी केलेल्या कोरोना चाचणीचा खोटा नकारात्मक निकाल येण्याची शक्यता खूपच कमी आहे. फॉल्स निगेटिव्ह म्हणजे एखाद्याला संसर्ग झाला आहे, त्यानंतरही त्यांची चाचणी निगेटिव्ह येते.

दिवसभर अ‍ॅक्टिव्ह असते आपली इम्यून सिस्टीमइतर अनेक विषाणू आणि बॅक्टेरिया इत्यादींप्रमाणे, कोरोना विषाणूचे देखील व्यक्तीच्या शरीराच्या घड्याळानुसार वेगवेगळे परिणाम होतात. असं मानलं जातं की, दिवसभरात एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती अधिक सक्रिय असते आणि या काळात विषाणूचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे यावेळी योग्य परिणाम मिळण्याची शक्यता जास्त असते. या अभ्यासात कोरोना विषाणूची चाचणी आणि उपचाराची नवीन पद्धत अवलंबण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स