निरोगी आरोग्यासाठी ज्याप्रमाणे पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शरीराची हालचाल होणं देखील गरजेचं आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाण्यासाठी व्यायाम, योगासनं नियमित करणंही आवश्यक आहे. सकस आहाराचा अभाव आणि शरीराची हालचाल न झाल्यानं पोटाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास देखील होऊ शकतो. बद्धकोष्ठता (Constipation Home Remedies )त्रास म्हणजे कठीण स्वरुपात शौचास होणे, पोट स्वच्छ न होणे आणि मलत्याग करताना त्रास होणे. हा त्रास होण्यासाठी कोणती कारणे असतात? त्यावर उपाय काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
बद्धकोष्ठतेची कारणे
- हालचाल कमी असणे
- पौष्टिक आहाराचा अभाव
- वजन कमी किंवा जास्त असणे
- मानसिक विकारांमुळे हा त्रास होऊ शकतो
- कॅल्शियमयुक्त पदार्थांचे अतिरिक्त सेवन
- पोटाचे सर्वच विकार
- शरीरात पाण्याची कमतरता असणे
- दुधाच्या सेवनाचा अभाव
- अंमली पदार्थांचे व्यसन
- अति प्रमाणात चहा आणि कॉफी पिणे
- बदलती जीवनशैली, बैठ्या स्वरुपातील कामे
- उच्च रक्तदाब आणि डिप्रेशनवर सुरू असलेल्या औषधोपचारांमुळेही हा त्रास उद्भवू शकतो
बद्धकोष्ठता कशी टाळावी
फायबरमुळे पोट स्वच्छ होतेबद्धकोष्ठतेचा त्रास लहानांपासून ते वयोवृद्धांमध्येही आढळतो. हा त्रास कमी करण्यासाठी फायबरयुक्त आहाराचे सेवन करावे.फायबरयुक्त पदार्थांमुळे शरीराची पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. फायबरच्या सेवनामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे पचन प्रक्रियेवर कोणताही ताण येत नाही. अन्नपदार्थांचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते.
बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी करा योगअश्विनी मुद्रा : योग क्रियेमध्ये अश्विनी मुद्रा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. अश्विनी मुद्रेमुळे हर्निया, गुदद्वारसंबंधीचे आजार, बद्धकोष्ठता इत्यादींचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. अश्विनी मुद्रेमध्ये गुदद्वार आकुंजन करणे आणि त्यानंतर सैल सोडण्याची क्रिया केली जाते. तुम्हाला जमिनीवर किंवा खुर्चीवर बसून ही क्रिया करणे शक्य आहे, त्या पद्धतीनं या योगाभ्यासाचा सराव करावा. पण दोन्ही हात कायम ज्ञान मुद्रेमध्ये असावेत.