शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

थंडी आली, सफरचंदासह संत्री-मोसंबी भरपूर खा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 09:33 IST

सीताफळालाही ग्राहकांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबई बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सफरचंदासह संत्री व मोसंबीची आवक वाढू लागली आहे. सीताफळलाही ग्राहकांची पसंती मिळत असून, फळांच्या बाजारात सद्यस्थतीमध्ये महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी भाव खात असून होलसेल मार्केटमध्ये ती १२० ते २५० रुपये किलो दराने विकली जात आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीमध्ये सरासरी दोन हजार टन फळांची आवक हाेत आहे. हिमाचलच्या सफरचंदाचा हंगाम संपत आला असला तरी कोल्डस्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध असल्यामुळे वर्षभर सफरचंद ग्राहकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असते. सद्यस्थितीमध्ये ४५० टनपेक्षा जास्त आवक होऊ लागली आहे. सफरचंदानंतर सर्वाधिक आवक संत्र्याची होत आहे. अमरावती व नागपूरवरून शुक्रवारी तब्बल २३८ टन संत्र्याची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये २५ ते ५० व किरकोळ मार्केटमध्ये  १०० रुपयांपर्यंत दर मिळू लागला आहे. जवळपास १५० टन मोसंबीचीही आवक होऊ लागली आहे.       

राज्याच्या विविध भागातून ६० टन सीताफळाची आवक होत आहे. फळ मार्केटमध्ये महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची चर्चा आहे. मार्केटमध्ये २५ ते ३० टन आवक होत आहे. स्ट्रॉबेरीला १२० ते २५० रुपये दर मिळत आहे. आवक वाढल्यामुळे बाजार समितीचे फळ मार्केट संत्री व मोसंबीमय झाले आहे.

शुक्रवारची आवक व प्रतिकिलो भाव फळ    आवक (टन)    बाजारभाव सफरचंद    ४५५    ६५ ते १४०संत्री    २३८    २५ ते ५०मोसंबी     १३७    ३० ते ६०स्ट्रॉबेरी    २८    १२० ते २५०खरबूज    ७७    २५ ते ३५अननस    १५९    २० ते ४०कलिंगड    १७७    १२ ते १६पपई    १६६    १४ ते ३०

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीfruitsफळे