तहान लागल्यावर अनेक जण पाणी किंवा सरबतं पिण्याऐवजी कोल्डड्रिंक्स पिणं पसंत करतात. मात्र वारंवार कोल्डड्रिंक्स पिण्याची ही सवय आपल्याला महागात पडू शकते. कोल्डड्रिंक्स पिण्याच्या दुष्परिणामांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
पचनक्रिया मंदावतेकोल्डड्रिंक्सचे व्यसन लागल्यावर त्याचे शरीरावर घातक परिणाम होतात. शरीराची पचनक्रिया मंदावल्याने शरीरावरील चरबी वाढते. त्यामुळे सातत्याने कोल्डड्रिंक्सचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
दातांच्या समस्या उद्भवतातकोल्डड्रिंक्समध्ये सोड्याचे प्रमाण जास्त असल्याने ते आरोग्यासाठी घातक असते. यामुळे तोंडाचे आरोग्य बिघडते. दातांवर कोल्डड्रिंक्सचे थर साचल्याने दात लवकर किडतात. त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात कोल्डड्रिंक्स घेत असाल तर त्याचे प्रमाण नक्कीच कमी करायला हवे.
हाडे ठिसूळ होण्याची शक्यताहाडांमध्ये असणाऱ्या खनिजांवर सोड्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि वारंवार फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. तसेच कोल्डड्रिंक्समध्ये असणाऱ्या कॅफीनमुळे शरीरातील कॅल्शियम लघवीवाटे शरीराबाहेर जाते. त्यामुळेही हाडांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती ठिसूळ होतात