शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत वाढतो हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका, हृदयरोगतज्ज्ञांची माहिती; हृदयरोग्यांच्या संख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 06:12 IST

Health News: हिवाळा सुरू झाला असून तापमानात हळूहळू घट होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावरही होऊ लागला आहे. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढत आहे.

नवी दिल्ली - हिवाळा सुरू झाला असून तापमानात हळूहळू घट होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावरही होऊ लागला आहे. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते,  थंड हवामानात उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. त्यांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. अति थंडीत हृदयविकाराचा त्रास, ब्रेन स्ट्रोक आणि अर्धांगवायूचा धोका असतो. तज्ज्ञांच्या मते, हिवाळा जसजसा वाढत जातो तसतशी रुग्णालयांमध्ये हृदयरोग्यांच्या संख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे.

दुर्लक्ष पडेल महागातउच्च रक्तदाबाच्या रुग्णांना हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. त्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर मधुमेही रुग्णांना पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार ठेवा. वेदना, जडपणा या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका, असे आवाहन हृदयरोगतज्ज्ञांनी केले आहे.

असा वाढतो धोका...- थंडीमुळे हिवाळ्यात धमन्या आकसतात. रक्तवाहिन्यांना रक्त पाठवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते.- ऑक्सिजनची कमतरता- गुठळ्या होण्याचा धोका- हृदयातील रक्तप्रवाह वाढतो. हिवाळ्यात तळलेले पदार्थ जास्त खाणे- मद्यपान आणि धूम्रपान यांचा अतिरेक- तणाव आणि नैराश्य-  व्यायाम न करणे

- २८.१% मृत्यू हे भारतात २०१६ मध्ये हृदयविकाराने झाले, अशी माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली होती.- १५.२% मृत्यू १९९० मध्ये हृदयविकाराने होत होते.- ११ कोटी पुरुष, ८ लाख महिलांना जगभरात हृदयरोग आहे.- ९० लाख लोकांचा हृदयरोगामुळे दरवर्षी मृत्यू होतो.- २०१९ मध्ये सर्वाधिक मृत्यू हे  हृदयरोगामुळे झाले. - ६-१ मृत्यू जगभरात हृदयरोगामुळे होतो

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealthआरोग्य