शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ आदत, स्वच्छ भारत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 16:28 IST

उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील स्वाती (नाव बदलले आहे) आठ वर्षांची आहे. तिच्या आईवडिलांना चार अपत्ये असून ही सर्वांत लहान आहे.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील स्वाती (नाव बदलले आहे) आठ वर्षांची आहे. तिच्या आईवडिलांना चार अपत्ये असून ही सर्वांत लहान आहे. साक्षी ही ज्ञानगंगा या पालिकेच्या प्राथमिक शाळेत तिसरी इयत्तेत शिकते आहे. शिक्षकांनी साक्षीच्या पालकांना सांगितले की, ती आपल्या वर्गातील सर्वात हुशार व जिज्ञासू विद्यार्थ्यांपैकी एक आहे. साक्षीचे आई-वडील शिक्षणापासून वंचित राहिल्याने साक्षीला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळून तिची स्वप्ने पूर्ण व्हावीत अशी त्यांची इच्छा आहे.

केवळ अभ्यासातच नव्हे तर स्वाती कलागुणांमध्येही आघाडीवर असते. गावातील मुलांना क्रिकेट खेळण्यातही ती मागे टाकते, तर गावातल्या दीदीकडे शास्त्रीय संगीताचेही धडे गिरवते. स्वातीच्या पालनपोषणासाठी तिचे आईवडील खूप मेहनत घेत आहेत. एका आशा कार्यकर्तीने तिच्या पालकांना सांगितले आहे की, स्वातीला आता या वयातच सर्वाधिक पोषणाची आवश्यकता आहे. स्वातीला योग्य आहार मिळावा व पोषण व्हावे याकडे तिच्या वडीलांचेही बारीक लक्ष असते. पण एका गोष्टीमुळे स्वातीचे पालक काळजीत होते. स्वाती जवळजवळ नेहमीच आजारी असायची. यंदा पावसाळ्यात दोन वेळा अतिसारामुळे ती आजारी पडली होती. सलग तीन आठवडे आजारपणामुळे शाळेत गैरहजर असल्याने स्वातीला गणिताचा अभ्यास जमत नाहीये. आई-वडिलांच्या हे देखील लक्षात आले आहे की, स्वाती तिच्या शहरात राहणाऱ्या चुलत भावापेक्षा बारीक आणि उंचीलाही लहान आहे. त्यामुळे गावातील स्थानिक डॉक्टरांनी तिला तालुक्याच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथील डॉक्टरांनी स्वाती ही कुपोषित असल्याचे सांगितले. मात्र यामुळे तिच्या वडीलांना धक्का बसला. वेळोवेळी पूर्ण आहार आणि योग्य पोषण देत असूनही स्वातीबद्दल डॉक्टरांनी असे सांगितल्याबद्दल वडीलांना आश्चर्य वाटले. देशाने उदयोन्मुख आर्थिक महाशक्ती म्हणून उडी घेतली असली तरी, आजही तीन मुलांपैकी एकपेक्षा अधिक मुलांची वाढ खुंटते आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे २०१५-१६ नुसार, देशातील ०-५९ महिन्यांचे बालकांमध्ये वाढ खुंटण्याचे प्रमाण ३८. ४ टक्के आहे. जागतिक स्तरावर याची तुलना केल्यास हे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे कमीतकमी मानसिक क्षमता, मधुमेह, हायपरटेन्शन आणि लठ्ठपणा यांमध्ये वाढ होण्याची जोखीम असलेल्या अविकसित मेंदू या आजारांची लक्षणे दिसून येतात. यामुळे बालकांच्या वर्तमान व भविष्यावर नकारात्मक परिणाम होतो.

बहुसंख्य संशोधकांनी मुलांमध्ये आजारपण आणि कुपोषण/ वाढ खुंटणे यातील संबंध सिद्ध केले आहेत. न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार जगभरातील पाच वर्षांखालील मुलांना अन्नापासून वंचित असल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढते आहे. याव्यतिरिक्त, ९ .२ टक्के लहानग्यांना अतिसाराचा धोका असल्याचे आढळून आले आहे. यामुळे शाळेत हजेरी लावू न शकल्याने नुकसान होते आणि त्यांना त्यांच्या बालपणाचा संपूर्णपणे आनंद घेता येत नाही. स्वाती तिच्या पालनपोषणापासून वंचित असण्यामागे अनेक कारणे आहेत. स्वातीचे कुटुंब आणि तिच्या गावातील नागरिक खुल्या जागी शौचास बसतात. शिवाय, उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी पित नाहीत. तसेच, हात धुण्यासाठी साबणाचा वापर न करता केवळ आंघोळीकरिता वापरतात. डॉ. पीयूष खडपे यांच्या म्हणण्यानुसार कुटुंबाला योग्य पोषणासाठी केवळ आहार उपयुक्त नाही. त्यासाठी कुटुंबाला चांगल्या सवयी असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भारतातील पाणी, स्वच्छता आणि स्वच्छताविषयक समस्येचे निराकरण तीन साध्या सवयींमध्ये दडले आहे. या साध्या सवयीत ‘हात, मुह आणि बम’च्या स्वच्छतेत आहे. या सवयींमुळे आजारांच्या पुनरावृत्तीचे प्रमाण कमी होते. 

स्वातीची गोष्ट गेल्या वर्षीची आहे. स्वातीच्या गावात आता बदल दिसत आहे. ‘स्वच्छ भारत’ मिशनचा भाग म्हणून सरकारने शौचालये उभारण्यासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या ‘‘स्वच्छ आदत, स्वच्छ भारत’’ यांनी त्यांच्या दोन मोहिमांच्या माध्यमातून या गावाचा कायापालट केला आहे. स्वच्छता दूत उपक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यात मोबाईल फोनचा वापर करून स्वच्छ शौचालये वापरणे, उकडलेले किंवा फिल्टर केलेले पाणी पिणे, साबणाने हात धुण्याचे वचन गावकऱ्यांनी दिले आहे. स्वच्छतेच्या सवयी राखण्यासाठी स्वच्छ आद्य पाठ्यक्रमात, २१ दिवसांच्या अभ्यासक्रमाची सुरुवात स्वातीच्या शाळेत झाली. आता स्वातीचा मित्रपरिवार स्वच्छतादूत बनले आहे. तसेच, तिच्या कुटुंबातील सदस्यही स्वच्छतेचे दूत झाले आहेत. स्वातीचे भविष्य आता सुरक्षित आणि उज्ज्वल आहे. भविष्यात, स्वातीसुद्धा प्रसिद्ध क्रिकेटपटू मिताली राजप्रमाणे आदर्श खेळाडू बनू शकेल. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड ‘स्वच्छ आदत, स्वच्छ भारत’ या मोहीमेद्वारे २०२० पर्यंत कोट्यवधी लहानग्यांपर्यत ‘हात, मुह, बम’ या सवयींचा प्रसार, प्रचार करणार आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर त्यांच्या नव्या मोहिमेद्वारे कुपोषण/वाढ खुंटणे आणि आजारी पडण्याची ‘नवी अन्य कारणे’ शोधत आहेत. या माध्यमातून केवळ छोट्या छोट्या आजारांमुळे अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘एचयूएल’ प्रयत्नशील आहे. सततच्या आजारपणामुळे क्रिकेट आवडत असतानाही त्यात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी न मिळालेल्या मध्यप्रदेशातील रामकुला येथील स्वातीसारख्या अनेक लहानग्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी www.hul.co.in/sasb या संकेतस्थळाला भेट द्या.

...........लहान मुलांना लगेचच संसर्ग होतो. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच हात धुण्याविषयी सांगणे गरजेचे आहे. याशिवाय, शाळेत वा घरांत कुठेही खाऊ खाताना हात धुणे आवश्यक आहे. बाहेरील वातावरणांत प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने लहानग्यांना आजारांचा अधिक धोका संभावतो. त्यामुळे या वयोगटातील मुलांना निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या सवयीचे हेच पहिले औषध आहे.- डॉ. स्वरुपा शाह, बालरोगतज्ज्ञ

प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

>> वैयक्तिक स्वच्छतेसोबत परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.>> जेवणाआधी व शौचास जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे.>> जेवण बनवणाºया वा मुलाला भरवणाऱ्या व्यक्तीने स्वतचे हात स्वच्छ धुवावे.>> आजारी व्यक्तीने जेवण तयार करू नये व बालकाला भरवूही नये.>> भाजीपाला, फळे वापराआधी स्वच्छ धुवावीत. 

जिवाणू वा विषाणूमुळे आजार झाला असल्यास ही लक्षणे दिसतात...

>> शौचास होणे, ओकारी होणे, ताप.>> पोट दुखणे, शौच झाल्यावरही जाण्याची इच्छा होणे.>> लघवीचे प्रमाण कमी होऊन ती गडद रंगाची होणे.>> मोठ्या मुलांना तहान जास्त लागणे.>> डोके दुखणे, चक्कर आल्यासारखे वाटणे.>> खाण्याची इच्छा कमी होणे.>> शौचासोबत रक्त आणि आव पडणे.>> आजाराची तीव्रता जास्त असल्यास वजन कमी होणे.>> तोंड, जिभेसह त्वचा शुष्क होणे.

लहानग्यांची वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची!

आजारांना दूर सारण्यासाठी चांगल्या सवयी लावण्याचा सल्लालहान मुलांमध्ये ‘व्हायरल’ इन्फेक्शन झपाट्याने पससत असून परिणामी लहानग्यांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मुलांची शाळा तर बुडते आहेच; शिवाय पालकांना काम सोडून त्यांना दवाखान्यात घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे पालक आणि शाळांनी थोडी काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे. बदलते हवामान, त्यातच तापाची साथ अशा वातावरणात डोक्याला ‘ताप’ होईल, अशी अवस्था झाली आहे. तापासह सर्दी, खोकला यांसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. सध्याचे वातावरण डेंग्यू आणि स्वाइन फ्लूसदृश आजाराच्या वाढीसाठी पोषक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे महत्त्वाचे म्हणजे, लहानग्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ.धनंजय सक्सेना यांनी दिला. शहरातल्या बहुतांश रुग्णालयांमध्ये बाल रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. ताप येणे, अंगदुखी, जुलाब, उलट्या यांसारख्या आजारांनी लहान मुलांना बेजार केले आहे. पाण्यातून अथवा हवेतून आजारांचा प्रार्दुभाव होत असल्याचे आढळून येते. लहान मुले शाळेच्या निमित्ताने एकमेकांशी संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना श्वसनाद्वारे साथीच्या आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत मुलांना ताप आला असेल तर त्यांना शक्यतो शाळेत पाठविणे टाळा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

अशी घ्या मुलांची काळजीमुलांना बाहेरचे आणि उघड्यावरचे अन्न टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, शक्यतो पाणी उकळून व गाळून प्या, मुलांना शाळेच्या डब्यात हलका आहार द्या. मुलांना सतत हात स्वच्छ धुण्याची सवय लावा. घरात स्वच्छता पाळावी, आजारी मुलांना शाळेत पाठवू नये.

टॅग्स :MumbaiमुंबईSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान