शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं तर चुकूनही करू नका या चुका, जीवाला होऊ शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:19 IST

High Cholesterol causes : काही लोकांना चुकीचं खाण्या-पिण्याच्या सवयी असतात. ज्याच्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. अशात अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण काय आहे?

High Cholesterol causes :  शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणजे हार्ट अटॅकचा धोका वाढणं. अशात तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल, नाही तर पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. या स्थितीतून वाचण्यासाठी तुम्हाला सर्वातआधी डाएटमध्ये बदल करावा लागेल. कारण काही लोकांना चुकीचं खाण्या-पिण्याच्या सवयी असतात. ज्याच्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. अशात अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण काय आहे? आणि कोलेस्ट्रॉल वाढल्यावर काय करू नये? चला जाणून घेऊ याचं उत्तर.

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी?

सर्वातआधी तर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही आहारात काय घेत आहात? कारण ज्याप्रकारचा आहार तुम्ही घ्याल शरीरावर त्याच प्रकारचा प्रभाव पडणार. जर तुम्ही जास्त प्रमाणात फॅट असलेले पदार्थ खात असाल तर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. अशात हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. जास्तीत जास्त हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा. याने तुम्हाला फायदा मिळेल.

लठ्ठपणा

तुम्हाला माहीत आहे का की, जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. अशात तुम्ही वजन वाढू देऊ नका. सतत एक्सरसाइज करा. जेणेकरून अशाप्रकारचे आजार तुम्हाला होऊ नये. वजन कमी करण्यासाठी आहार आणि एक्सरसाइज दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.

मद्यसेवन आणि धुम्रपान

जर तुम्ही मद्यसेवन करण्यासोबतच स्मोकिंगही करत असाल तर तुम्ही आरोग्यासोबत खेळ करत आहात. कारण सर्वांनाच माहीत आहे की, या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. अशात या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. असं केलं नाही तर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता दाट असते. ज्यामुळे तुम्हाला लवकर हार्ट अटॅक येण्याचाही धोका असतो.

जंक फूड खाणं

जर टेस्टमध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं दाखवलं असेल तर जंक फूड्स खाणं लगेच सोडा. डॉक्टरांनुसार, पिझ्झा, मोमोज, चाउमीन, बर्गरसारखे जंक फूड सडलेल्या मैद्यापासून तयार केले जातात. ज्यामुळे आरोग्याला गंभीर नुकसान होतं. त्याशिवाय प्रोसेस्ड फूड्स, पॅकेज्ड फूड्स आणि मीटमुळेही कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर हे फू़ड्स खाणं सोडा.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य