शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चॉकलेट, कॉफी आणि अ‍ॅसिडिटीमध्ये आहे खोलवर संबंध, जाणून घ्या कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 10:59 IST

मूड चांगला असेल तर चॉकलेट आणि चांगला नसेल तरी चॉकलेट. प्रेमापासून ते प्रपोज करण्यापर्यंतचा प्रवास चॉकलेटनेच सुरु होतो.

मूड चांगला असेल तर चॉकलेट आणि चांगला नसेल तरी चॉकलेट. प्रेमापासून ते प्रपोज करण्यापर्यंतचा प्रवास चॉकलेटनेच सुरु होतो. हेच कॉफीबाबत सांगता येईल. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत कॉफी पिण्याचं कोणतं ना कोणतं कारण असतंच. पण तुम्हाला माहीत आहे का की, चॉकलेट, कॉफी आणि अ‍ॅसिडीटचा खोलवर संबंध आहे. तुम्हालाही या दोन गोष्टींची सवय लागली असेल तर अ‍ॅसिडिटीपासून तुमची सुटका होऊ शकत नाही.  

चॉकलेट

चॉकलेटची टेस्ट पसंत नसणारा क्वचितच कुणी सापडेल. पण हे आपल्या पोटासाठी फारच नुकसानदायक ठरु शकतं. ज्या लोकांनी नेहमी अ‍ॅसिडची समस्या असते त्यांच्यासाठी चॉकलेट घातकच मानलं जातं. यात कॅफीन आणि थियोब्रोमाइनसारखे पदार्थ असतात, जे अ‍ॅसिडचं कारण ठरतात. तसेच यात भरपूर फॅट असतात, ज्यामुळे अ‍ॅसिड तयार होतं. त्यासोबतच यातील कोकोमुळेही समस्या होते. याने रिफ्लक्स वाढतं. चॉकलेट खाणं बंद करणं गरजेचं नाहीये, पण जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर कमी प्रमाणात चॉकलेट खावं. 

कॉफी

काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या कॉफी पिण्याची सवय असते. तेच काही लोक ऑफिस पोहोचून कॉफीचं सेवन करतात. मित्रांसोबत गप्पा करताना, अभ्यास करताना आणि रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पितात. जर तुम्ही किती कॉफी सेवन करता याचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही आरोग्यावर किती अन्याय करत आहात. दिवसभरात एक कप कॉफी किंवा चहा पिणे पुरेसं आहे. पण याचं अधिक सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या डोकं वर काढते. कारण यात कॅफीनचं प्रमाण अधिक असतं. कॅफीन सेवनामुळे पोटात गॅस्ट्रिक अ‍ॅसिडचा स्त्राव होतो. ज्यामुळे अ‍ॅसिडिटी होते. त्यामुळे कधीही रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी सेवन करुन नये. 

अ‍ॅसिडिटी

आपण खाल्लेलं अन्न योग्यप्रकारे पचन न झाल्यास पोटात गॅस आणि जळजळ होऊ लागते. यहा शरीराचा डिहायड्रेट होण्याचाही संकेत आहे. त्यामुळे योग्य ठरेल की, चहा, कॉफी आणि चॉकलेटचं सेवन कमी प्रमाणात करावं. सोबतच याकडेही लक्ष द्या की, तुम्ही किती प्रमाणात चहा सेवन करत आहात. जास्तीत जास्त पाणी प्यावं. म्हणजे एक कप एक्स्ट्रा कॉफी प्यायल्यास दोन कप एक्स्ट्रा पाणी प्यावे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स