शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

चिंता से घटे चतुराई... एन्झायटी फेका खड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:49 IST

anxiety : ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला विश्वचषक उपांत्य सामन्यामध्ये भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा असलेल्या मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने चिंतारोगाचा (एन्झायटी) त्रास असल्याचे सांगितले. हा आजार मानसिक आरोग्याशी निगडित सर्वात सामान्य समस्या आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी अशा सर्वांनाच काही ना काही कारणांमुळे बेचैनी, घबराट किंवा अस्वस्थता जाणवते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार योग्य जाणीव, शिस्त आणि स्वतःची काळजी घेतल्यास त्यावर सहज नियंत्रण मिळविता येते.

-डॉ. सपना नायक-बांगर (मानसोपचार तज्ज्ञ)ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला विश्वचषक उपांत्य सामन्यामध्ये भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा असलेल्या मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने चिंतारोगाचा (एन्झायटी) त्रास असल्याचे सांगितले. हा आजार मानसिक आरोग्याशी निगडित सर्वात सामान्य समस्या आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी अशा सर्वांनाच काही ना काही कारणांमुळे बेचैनी, घबराट किंवा अस्वस्थता जाणवते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार योग्य जाणीव, शिस्त आणि स्वतःची काळजी घेतल्यास त्यावर सहज नियंत्रण मिळविता येते. 

चिंता (एन्झायटी) म्हणजे काय? : मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, चिंता ही तणावावर शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. काही अनिश्चित गोष्टींबद्दल भीती वाटणे, हे सामान्य आहे, पण जेव्हा ही भावना सतत राहते आणि दैनंदिन जीवनात अडथळा आणते, तेव्हा ती गंभीर बनते. याबाबत संकेत ओळखा. खूप वेगाने विचार येणे, हृदयाचे ठोके वाढणे, एकाग्र न होणे ही लक्षणं आहेत.स्वीकारा आणि समजून घ्या : चिंतेवर मात करण्याचेपहिले पाऊल म्हणजे ती मान्य करणे. ती लपवण्याऐवजी स्वतःला "हो, मला चिंता आहे आणि ते ठीक आहे," असे सांगणे महत्त्वाचे. स्वीकारल्याने भीती कमी होते आणि मन हलके होते.श्वसन व ध्यान : दीर्घ श्वसनाचे सोपे व्यायाम चिंताकमी करण्यास मदत करतात. खोल श्वास घेतल्याने शरीर शांत होते. ध्यान आणि माइंडफुलनेस तंत्र आज जगभर लोकप्रिय आहेत. मोबाइल अॅप्स किंवा ऑनलाइन क्लासेसमुळे हे शिकणे सोपे झाले आहे.संतुलित जीवनशैली : चांगला आहार, पुरेशी झोपआणि नियमित व्यायाम हे मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक आहेत.आहार : फळे, भाज्या आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ मेंदूसाठी चांगले.हे टाळा : कॅफिन आणि साखरेचे जास्त सेवन.व्यायाम : रोज ३० ते ४५ मिनिटे चालल्याने शरीरात 'हॅपी हार्मोन्स' तयार होतात.झोप : दररोज किमान सात तासांची चांगली झोप चिंता कमी करते.डिजिटल ताण टाळा : सतत मोबाइल वापरणे किंवा बातम्या पाहणे मनावर अतिरिक्त ताण आणते. त्यामुळे 'डिजिटल सीमारेषा' ठरवा, म्हणजे ठरावीक वेळेतच मोबाइल वापरा. मनालाही माहितीपासून विश्रांती हवी असते. काही तास डिजिटल जगापासून दूर राहणे हे स्वतःची काळजी घेण्याचा भाग आहे.

सतत चिंता वाटत असेल आणि आयुष्यावर परिणाम करत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी, समुपदेशन किंवा आवश्यकतेनुसार औषधोपचार हे उपचार प्रभावी ठरतात. आता काही शहरांतील मानसिक आरोग्य केंद्रे ऑनलाइन सल्लाही देतात.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Beat Anxiety: Tips to Reduce Worry and Boost Mental Health

Web Summary : Anxiety is common, but manageable. Recognize triggers, practice breathing, maintain a balanced lifestyle with good diet, exercise, sleep, and digital detox. Seek professional help if needed for therapies or medication.
टॅग्स :Healthआरोग्य