शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

पॉझिटिव्ह बातमी! शर्यतीत पुढे गेली चीनी कंपनीची लस; साईड इफेक्ट्सशिवाय इम्युनिटीवर ठरली प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 18:27 IST

CoronaVirus News & Latest Updates : संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार  १९१ स्वयंसेवकांवर पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल करण्यात आलं होतं. सगळ्या वॉलेंटिअर्सचं वय १८ ते ५९ वर्ष या दरम्यान होते.

(Image Credit-The conversation)

चीनमध्ये कोरोना व्हायरसची एक्सप्रिमेंटल लस सुरक्षित आणि प्रभावी ठरली आहे. ही लस चायनीज अॅकडेमी ऑफ मेडिकल सायंसेजच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल बायोलॉजीकडून विकसित करण्यात आली आहे. क्लिनिकल ट्रायलच्या सुरूवातीच्या टप्प्यात ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार  १९१ स्वयंसेवकांवर पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल करण्यात आलं होतं. सगळ्या वॉलेंटिअर्सचं वय १८ ते ५९ वर्ष या दरम्यान होते.

मंगळवारी वैज्ञांनिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणत्याही गटातील स्वयंसेवकांवर साईट इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. लस दिल्यानंतर हलकी लक्षणं स्वयंसेवकांमध्ये दिसून आली होती. लस दिल्यानंतर स्वयंसेवकांना इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी सौम्य वेदना,  थकवा, खाज, सूज अशा समस्या जाणवल्या तर रोगप्रतिकारकशक्तीवर चांगला परिणाम दिसून आल्याचे सांगितले जात आहे. 

या चाचणीतील  परिक्षण डेटावरून लस प्रभावशाली, सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. चीनसह अजूनही काही लसी शर्यतीत पुढे आहेत. त्यात कॅनसिनो बायोलॉजिकल, सिनोवॅक आणि बीजिंग इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकलद्वारे विकसित करण्यात आलेल्या  लसीचा समावेश आहे.  दरम्यान या लसीची चाचणी पूर्ण होण्याआधीच आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या लोकांना, गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या लोकांना लस देण्याची मोहिम चीनमध्ये सुरू झाली होती. या लसीच्या सुरक्षिततेबाबत वैज्ञानिकांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.  सध्या चीनी कंपनीच्या चार लसी या क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. 

पुढच्यावर्षी मार्चमध्ये येणार कोरोनाची लस येणार का?

अनेक देशांतील लसी या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यातील पोहोचल्या आहेत. भारतात 3 पैकी 2 लसी पुढच्यावर्षी मार्चपर्यंत लॉन्च होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढच्या वर्षापर्यंत कोरोनाची लस मिळण्याची अपेक्षा सरकारला आहे. गुरूवारी केंद्र सरकारचे काही मंत्री आणि लस तयार करत असलेल्या कंपन्यांमध्ये बैठक झाली होती.

या बैठकीत कोरोना व्हायरसची लस मार्चपर्यंत लॉन्च होऊ शकते असे संकेत मिळाले  होते. पण तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवर लस कधी  येणार हे अवलंबून असेल. सरकारी सुत्र ईटी यांनी  दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत लसीची वेळोमर्यादा, रेग्युलेटरी संस्थानांची मंजूरी प्रक्रिया, लसीची उपलब्धता, वितरण आणि अन्य काही मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती. आयुर्वेदिक काढा प्यायल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो?; आयुष मंत्रालयाने दिलं उत्तर

या बैठकीत लस तयार करत असलेली कंपनी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडीया आणि झायडस कँडिलाचे वरिष्ठ अधिकारी नीती आयोगाचे  सदस्य विनोद पॉल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सामिल झाले.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचे सचिव, आरोग्य विभाग, आयसीएमआर आणि फार्मास्युटीकल्सने १ ऑक्टोबरला झालेल्या या बैठकीत सहभाग घेतला होता. सर्वकाही व्यवस्थित असल्यास साधारण मार्च महिन्यापर्यंत कोरोनाची लस लॉन्च केली जाऊ शकते असे स्पष्ट करण्यात आले. दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....

टॅग्स :chinaचीनCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्या