शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

आपलं माणूस ओळखायची बाळांची युक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 05:47 IST

Baby : तान्ह्या बाळाला काय आठवतं, तो कसं लक्षात ठेवतो, हा खरोखरच कुतूहलाचा प्रश्न आहे. बाळ अठरा एक तास झोपलेलं असतं. त्यावेळी खरंच त्याच्या मेंदूत काही हालचाली होत असतील का, की तेव्हा मेंदूलाही विश्रांतीची आवश्यकता असते?

- डॉ. श्रुती पानसे(मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com)तान्ह्या बाळाला काय आठवतं, तो कसं लक्षात ठेवतो, हा खरोखरच कुतूहलाचा प्रश्न आहे. बाळ अठरा एक तास झोपलेलं असतं. त्यावेळी खरंच त्याच्या मेंदूत काही हालचाली होत असतील का, की तेव्हा मेंदूलाही विश्रांतीची आवश्यकता असते? बाळ अखंड झोपलेलं असतं, तरीही साधारण अडीच-तीन महिन्यांचं झाल्यावर जे त्याच्याजवळ आहेत, त्यांचा स्पर्श ते कसं ओळखतं? त्यांचे चेहरे हळूहळू का होईना, कसं ओळखायला लागतं? किंवा त्यांचे आवाजही ते कसं ओळखतं? 

- आईचा आवाज आला की, बाळ शांत होतं. कारण तिच्याशी त्याचा सहवास जास्त असतो. पोटात असल्यापासून आईचा आवाज त्याला सहज ऐकू येत असतो. बाकीच्यांचे आवाज तुलनेने अस्पष्ट ऐकू येतात, पण अगदी स्पष्ट ऐकू येत असतो, तो आईचा आवाज. या आवाजाशी त्याची अगदी जुनी ओळख असते. पुराना याराना या आवाजाशीच असतो फक्त. तसंच बाळाच्या  पाळण्यावर लावलेल्या चिमणाळ्याशीही त्याची  फारच दोस्ती होते. खोलीतला गरगर फिरणारा पंखा हाही त्याचा असाच पक्का दोस्त होतो. 

अशा पद्धतीने आसपासच्या जगाशी बाळाचा परिचय होत असतो. त्यातल्या काही गोष्टींशी फार लवकर मैत्री होते. हा मैत्रीचा संबंध दृढ कसा होतो? एकेक आठवण रुजू कशी होत जाते? या विषयावर न्यूरो सायंटिस्ट्सनी मूलभूत संशोधन केलं आहे. त्यावरून असं दिसतं की, प्रत्येक जीव जन्माला येतो, त्याच्या आधीपासूनच त्याच्या मेंदूची वाढ होत असते, त्याचबरोबर विकासही होत असतो. मेंदूतली ही प्रक्रिया काहीशी सुप्तावस्थेत असते.

आईच्या पोटात असतानाच त्याच्या मेंदूत न्यूरॉन्स नावाच्या पेशी तयार झालेल्या असतात. या पेशी फक्त मेंदूत असतात. इतरत्र शरीरात कुठेही नसतात. या पेशींना ‘शिकणाऱ्या पेशी’ असंही म्हणतात, इतकं त्यांचं महत्त्व आहे. त्या सुट्या स्वरूपात असतात. एकमेकींपासून अलग असतात.  बाळ जन्माला आलं की, त्या कार्यान्वित होतात. बाळाला जसे नवनवे अनुभव येतात, तसे हे न्यूरॉन्स एकमेकांशी जुळायला लागतात. मुख्य म्हणजे, या न्यूरॉन्सच्या जोडण्या म्हणजेच, त्याच्या आठवणीच्या जोडण्या असतात.  आयुष्यभर पुरेल इतकं काम या पेशींनी सुरुवातीच्या काही दिवसांतच करून ठेवलेलं असतं.

टॅग्स :Healthआरोग्य