शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशातील ५ ते १७ वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका; सर्वेक्षणात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:50 IST

२१ ते ५० वयाचे ६१.३१% नागरिक कोरोनाबाधित; दिल्लीत २९.१% लोकांमध्ये अँटीबॉडी

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे देशात निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती अद्यापही कायम आहे. या साथीमुळे रोज देशभरात ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, देशातील अनलॉकचे तीन टप्पे संपून चौथा टप्पा सुरू होण्याची वेळ जवळ आली तरी लोक पूर्वीप्रमाणे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. आॅक्सफर्डच्या कोविड - १९ लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूूट आॅफ इंडिया मंगळवारपासून सुरुवात करणार आहे. मात्र, याच सीरमच्या सर्वेक्षणानुसार लहान मुलांपासून युवकांना कोरोनाचा अधिका धोका असल्याचे समोर आले आहे.

राजधानी दिल्लीत ५ ते १७ वर्षांच्या मुलांना व युवकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर प्रकृतीची जास्त काळजी करावी लागतआहे. दिल्लीत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुतून ही माहिती समोर आली आहे. याच सर्वेक्षणानुसार दिल्लीतील २९.१ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी विकसीत झाल्याचे सांगण्यात आले. सर्वेक्षणात १५ हजार नागरिकांचा सहभाग होता. त्यात जवळपास २५ टक्के १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. तर १८ ते ५० वर्षे वयाच्या लोकांची संख्या ५० टक्के होती. उर्वरीत २५ टक्के नागरिकांची संख्या ५० वर्षांपेक्षा अधिक होती.

दरम्यान, अनलॉक-४ च्या टप्प्यात देशातील विविध महानगरांमधील लोकल आणि मेट्रो सेवा तसेच शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र अद्यापही बहुतांश लोक हे लोकल किंवा मेट्रोने प्रवास करण्यास तसेच मुलांना शाळेत पाठवण्यास अनुत्सुक असल्याचे समोर आले आहे. लोकल सर्कल्सने केलेल्या सवेर्नुसार ६२ टक्क्के पालकांनी आपण अद्यापही आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे सांगितले.आॅक्सफर्ड लसीच्या दुसºया चाचणीला सुरुवातकेंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला आॅक्सफर्डच्या लसीच्या दुसºया आणि तिसºया टप्प्यातील चाचण्या करण्यास ३ आॅगस्ट रोजी परवानगी दिली होती. या चाचण्या १७ निवडक ठिकाणी करण्यात येत आहेत. यात एम्स दिल्ली, बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे, राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, पाटणा यासह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. १८ वर्षांवरील १६०० नागरिक या चाचणीत सहभागी होणार आहेत. ब्रिटनमध्ये पाच ठिकाणी या लसीची दोन टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे आणि ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अँटीबॉडीज तयार झाल्याचेही दिसून आले आहे.देशात, २१ ते ५० वर्षीय नागरिकांची कोरोनाबाधित संख्या सर्वाधिक आहे. भारतीय वैद्यकीय अनुसंधान संस्थेच्या आकड्यांनुसार देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या २१ ते ५० वयाचे ६१.३१ टक्के नागरिक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे, ही आकडेवारी २१ आॅगस्टपर्यंतची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या