बालकाला घेतला माकडाने चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 00:03 IST2016-02-22T00:03:29+5:302016-02-22T00:03:29+5:30
जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांपाठोपाठ माकडांचाही धुमाकुळ वाढत असून रविवारी पुन्हा एका बालकाला माकडाने चावा घेतला.

बालकाला घेतला माकडाने चावा
ज गाव : शहरात मोकाट कुत्र्यांपाठोपाठ माकडांचाही धुमाकुळ वाढत असून रविवारी पुन्हा एका बालकाला माकडाने चावा घेतला.खंडेराव नगरातील मोहम्मद साहब अशफाक खान (६) हा बालक खेळत असताना त्याला माकडाने चावा घेतला. यात तो जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच खंडोरावनगरातच एका मुलाला माकडाने चावा घेतला होता. आता पुन्हा याच भागात माकडाने पुन्हा हल्ला केल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.