प्रभारी अधिकार्यावर कृषीचा कारभार बालविकास प्रकल्प अधिकार्यांच्या दोन्ही जागा रिक्तच
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:36+5:302014-12-20T22:27:36+5:30
औसा : तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात अनेक महत्वाच्या अधिकार्यांच्या जागा रिक्त आहेत. मागील चार ते पाच महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील दोनही अधिकार्यांची पदे रिक्त आहेत. तर संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार पदही रिक्तच आहे. तसेच सात प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच आरोग्य अधिकार्यांची पदेही रिक्त आहेत. या रिक्त पदावरील अधिकार्यांचा भार अन्य अधिकार्यांवर पडत आहे.

प्रभारी अधिकार्यावर कृषीचा कारभार बालविकास प्रकल्प अधिकार्यांच्या दोन्ही जागा रिक्तच
औ ा : तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात अनेक महत्वाच्या अधिकार्यांच्या जागा रिक्त आहेत. मागील चार ते पाच महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील दोनही अधिकार्यांची पदे रिक्त आहेत. तर संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार पदही रिक्तच आहे. तसेच सात प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच आरोग्य अधिकार्यांची पदेही रिक्त आहेत. या रिक्त पदावरील अधिकार्यांचा भार अन्य अधिकार्यांवर पडत आहे. औसा तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेला नायब तहसीलदारच नाहीत. पंचायत समितीमध्ये सर्व जागा भरल्या असल्या तरी औसा व किल्लारी येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये आहेत. या दोन्ही पदाचा कारभार सध्या सहाय्यक गटविकास अधिकारी हेच पाहतात. औशात अव्वल कारकुनाच्या दोन तर तलाठ्याच्या तीन आणि कोतवालाच्या ३८ जागा रिक्त आहेत. आरोग्य विभागात मात्र सर्वाधिक जागा रिक्त आहेत. तालुक्यात ७ प्रमुख आरोग्य केंद्र असून, भादा ते बेलकुंड येथे प्रत्येकी दोन तर जवळगा (पो.) येथे एक अशा पाच वैद्यकीय अधिकार्यांच्या जागा रिक्त आहेत. आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक ११, परिचर ८, कनिष्ठ सहाय्यक ४ आणि आरोग्य सहाय्यिका ४ अशी पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाात विस्तार अधिकारीही महत्वाचे पद आहे. पण ४ पदे मंजूर असताना २ पदे रिक्त आहेत. एकूणच तालुक्यात तालुका कृषी अधिकार्यासह अन्यही काही महत्वाची पदे रिक्त आहेत.